Tarun Bharat

भारतीय महिला फुटबॉल संघाचा चायनीज तैपेईवर विजय

Advertisements

बहरीन : भारत आणि चायनीज तैपेई महिला फुटबॉल संघामध्ये बुधवारी येथे झालेल्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात रेणूच्या निर्णायक गोलाच्या जोरावर भारताने 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला.

बहरीनमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात भारताने यजमान बहरीनचा 5-0 असा दणदणीत पराभव केला होता. फिफा मानांकनात 40 व्या स्थानावर असलेल्या चायनीज तैपेईने बुधवारच्या सामन्यात आक्रमक खेळावर अधिक भर दिला. पण, भारताची बचावफळी भक्कम असल्याने चायनीज तैपेईला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. भारताच्या रेणूने सामन्याच्या पूर्वार्धात गोल नोंदवून चायनीज तैपेईवर आघाडी मिळविली होती. या गोलानंतर पाच मिनिटांच्या अंतराने रेणूने पुन्हा तैपेईच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारत चेंडू गोलपोस्टमध्ये मारला. पण पंचांनी हा गोल ऑफसाईड ठरवल्याने भारताची आघाडी वाढू शकली नाही.

Related Stories

सानिया मिर्झाचे पहिले जेतेपद

Patil_p

टोकियो ऑलिंपिक कुस्ती पात्र फेरी स्पर्धेच्या ठिकाणात बदल नाही

Patil_p

भारतीय हॉकी संघांचा युरोपियन दौरा अधांतरी

tarunbharat

एटीपी चषक टेनिस कॅनडा, बेल्जियमचे विजय

Patil_p

क्रीडामंत्र्यांकडून तिरंदाजांचे कौतुक

Patil_p

रोहित शर्माला वगळल्याचे गूढ!

Patil_p
error: Content is protected !!