Tarun Bharat

भारतीय महिला फुटबॉल संघ अमेरिकेकडून पराभूत

Advertisements

वृत्तसंस्था/ हेलसिंगबर्ग (स्वीडन)

येथे सुरू असलेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या तीन देशांच्या  फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात अमेरिकेने भारतीय महिला संघाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला.

या सामन्यात आठव्या मिनिटाला भारताचे खाते प्यारी झाझाने उघडले. त्यानंतर नवव्या मिनिटाला मेसीहा ब्राईटने अमेरिकेला बरोबरी साधून देताना गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे गोल बरोबरीत होते. मध्यंतरानंतर काही मिनिटातच अमेरिकेचा दुसरा गोल जेना निगस्वाँगरने नोंदविला. अमेरिकेच्या या दुसऱया गोलानंतर भारतीय संघातील मनिषा आणि डी. ग्रेस यांनी गोल करण्याची संधी गमविली. 74 व्या मिनिटाला अमेरिकेचा तिसरा गोल सिएरा इनेगीने केला. अमेरिकेचा चौथा गोल 85 व्या मिनिटाला ऍव्हा कुकने नोंदवित भारताचे आव्हान संपुष्टात आणले. 

Related Stories

‘सिलेक्टर्स’ निवडीसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले

Patil_p

महिला वनडे, पुरुष यू-19 विश्वचषक पात्रता स्पर्धा लांबणीवर

Patil_p

लंकेविरुद्ध पाकिस्तान 198 धावांनी पिछाडीवर

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया महिलांची मालिका स्थगित

Patil_p

स्विटोलिना, बर्टन्स यांची अमेरिकन टेनिस स्पर्धेतून माघार

Patil_p

पाँटिंग कुटुंबियांतील सदस्याला कोरोनाची बाधा

Patil_p
error: Content is protected !!