Tarun Bharat

भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इटलीतील व्हिलेसी येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या सहाव्या टॉरेनो चषक फुटबॉल स्पर्धेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मेक्सिकोने भारताचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

या सामन्यात मेक्सिकोतर्फे कॅथरिन सिलास आणि ऍलेसी गॅलेगोस यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत मेक्सिकोने भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या पूर्वार्धात सिलासने मेक्सिकोचे खाते उघडले. ऍलेसीने उत्तरार्धात मेक्सिकोचा दुसरा गोल नोंदवत भारताचे आव्हान संपुष्टात आणले. भारताला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.

Related Stories

कर्करोग झालेल्या बालिकेच्या मदतीसाठी साऊदीच्या जर्सीचा लिलाव

Patil_p

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर

Patil_p

आयर्लंड संघाच्या कर्णधारपदी लॉरा डिलेनी

Patil_p

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू श्रबसोल निवृत्त

Amit Kulkarni

अंकित बावणेच्या द्विशतकासह महाराष्ट्राचा धावांचा डोंगर

Patil_p

इटलीची पाओलिनी विजेती

Patil_p
error: Content is protected !!