Tarun Bharat

भारतीय महिला संघाला मिळाली बक्षीस रक्कम

वृत्तसंस्था/ मुंबई

इंग्लंडच्या दौऱयावर प्रयाण करण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना 2020 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱया भारतीय संघाला बक्षीस रक्कम देण्याची घोषणा बीसीअीआयने केली होती. खेळाडूंकडून इनव्हाईस मिळाल्यानंतर ती रक्कम आता या संघातील सर्व खेळाडूंच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ 2 जून रोजी लंडनला रवाना झाला होता. या दौऱयात भारतीय महिला संघ एकमेव कसोटी आणि त्यानंतर वनडे तसेच टी-20 मालिका खेळणार आहेत. 2020 च्या आयसीसी महिलांच्या विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपविजेपद मिळविणाऱया भारतीय संघातील 15 खेळाडूंना या बक्षीस रकमेचा लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मायदेशात झालेल्या मालिकेचे मानधनही बीसीसीआयने त्यांना दिले आहे. वर्ल्ड कपमधील कामगिरीचे प्रत्येक खेळाडूला सुमारे 26 हजार डॉलर्स मिळणार आहेत. हरमनप्रित कौरच्या भारतीय महिला संघाने या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण यजमान ऑस्ट्रेलियाकडून भारताला हार पत्करावी लागली होती.

Related Stories

यू-19 महिला टी-20 विश्वचषकात भारत अजिंक्य

Patil_p

आयपीएल स्पर्धेतील कामगिरीने ऑस्ट्रेलिया दौऱयाचे दडपण कमी : शमी

Patil_p

अमेरिकन ओपन स्पर्धा आजपासून

Patil_p

दशकांपूर्वीचा ‘विनोद’ ऑलिम्पिक उद्घाटन संचालकांना भोवला

Amit Kulkarni

लंका-बांगलादेश पहिली कसोटी अनिर्णीत

Amit Kulkarni

चेन्नई सुपरकिंग्स संघात अनुभवी अम्बाती रायुडूचे पुनरागमन

Patil_p