Tarun Bharat

भारतीय महिला संघ प्रथमच ‘गुलाबी’ कसोटी खेळणार

ऑस्ट्रेलिया दौऱयात ऍडलेडची एकमेव कसोटी दिवस-रात्र स्वरुपात, दौऱयात 3 वनडे व 3 टी-20 सामन्यांचा समावेश, भारतीय महिला संघासाठी नवा माईलस्टोन दृष्टिक्षेपात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

या वर्षाच्या उत्तरार्धात भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर प्रथमच पिंक बॉल दिवस-रात्र कसोटी क्रिकेट खेळणार आहे. ही लढत दि. 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत होईल. पर्थमध्ये या लढतीचे आयोजन केले गेले असून या मैदानावर एखादी दिवस-रात्र लढत होण्याची ही पहिलीच वेळ असेल. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबत प्राथमिक घोषणा केली.

‘महिला क्रिकेटमध्ये आम्ही आणखी एक पाऊल पुढे उचलत आहोत. भारतीय महिला संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयात आपली पहिलीच दिवस-रात्र कसोटी खेळेल’, असे शाह यांनी ट्वीट केले. त्याआधी भारतीय महिला जूनमध्ये इंग्लंड दौऱयावर जाणार असून भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याची मागील 7 वर्षानंतरची ही पहिलीच वेळ असणार आहे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध यापूर्वी 2006 मध्ये भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियन भूमीत शेवटची कसोटी खेळली होती. 

ऑस्ट्रेलियातील मालिकेत उभय संघात या एकमेव कसोटीसह 3 टी-20 व 3 वनडे देखील होणार आहेत. वनडे मालिका दि. 19 ते 24 सप्टेंबर या कालावधीत व टी-20 मालिका 7 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होईल.

महिला क्रिकेट इतिहासात दिवस-रात्र स्वरुपात एखादी कसोटी होण्याची ही केवळ दुसरीच वेळ असणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड महिला संघात नोव्हेंबर 2017 मध्ये सिडनीत गुलाबी चेंडूने एकमेव कसोटी झाली असून ती अनिर्णीत राहिली होती. भारतीय महिला संघाने अलीकडे मर्यादित षटकांचे क्रिकेट देखील खेळलेले नाही. त्यामुळे, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळणे संघासाठी साहजिकच आव्हानात्मक असणार आहे. सध्या महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेची रुपरेषा

तारीख / लढत / ठिकाण

  • 19 सप्टेंबर / पहिली वनडे / नॉर्थ सिडनी ओव्हल
  • 22 सप्टेंबर / दुसरी वनडे / जंक्शन ओव्हल
  • 24 सप्टेंबर / तिसरी वनडे / जंक्शन ओव्हल
  • 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर / दिवस-रात्र कसोटी / वाका ग्राऊंड
  • 7 ऑक्टोबर / पहिली टी-20 / नॉर्थ सिडनी ओव्हल
  • 9 ऑक्टोबर / दुसरी टी-20 / नॉर्थ सिडनी ओव्हल
  • 11 ऑक्टोबर / तिसरी टी-20 / नॉर्थ सिडनी ओव्हल.

Related Stories

सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा उपविजेते

Patil_p

ऍशेस मालिकेतील तिसरी कसोटी उद्यापासून

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्स सलग चौथ्यांदा पराभूत

Patil_p

लिजेंडस् लीग क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरात

Patil_p

कोरोनाने घेतली ‘आयपीएल’ची विकेट

Patil_p

सर्बियाचे फुटबॉल प्रशिक्षक ऍन्टीक कालवश

Patil_p