Tarun Bharat

भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला पराभव

Advertisements

वृत्तसंस्था/ ब्यूनोस आयरीस

भारताच्या महिला हॉकी संघाला अर्जेंटिनाच्या दौऱयावर पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. या दौऱयातील शुक्रवारी झालेल्या सामन्यात यजमान अर्जेंटिनाच्या ब महिला हॉकी संघाने भारताचा 2-1 अशा गोलफरकानी पराभव केला.

या सामन्यात 11 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या ब संघाचे खाते सॉल पॅगेलाने उघडले. भारतातर्फे एकमेव गोल सलिमा टेटेने 54 व्या मिनिटाला नोंदविला. अर्जेंटिना ब संघाचा दुसरा आणि निर्णायक गोल ऑगेस्टीना गोझेलेनीने सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना केला. अर्जेंटिनाच्या या दौऱयात भारतीय महिला हॉकी संघाने यापूर्वी झालेल्या अर्जेंटिनाच्या कनिष्ठ महिला संघाबरोबरचे दोन्ही सामने बरोबरीत राखले होते. आता भारतीय महिला हॉकी संघाचा या दौऱयातील पुढील सामना रविवारी अर्जेंटिना ब संघाबरोबर होणार आहे.

Related Stories

केन विल्यम्सनचे 24 वे कसोटी शतक

Patil_p

एचएस प्रणॉयचा ख्रिस्तीला धक्का

Patil_p

यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी भारतात

Patil_p

न्यूझीलंडला फलंदाजीतील खराब फॉर्मची चिंता

Patil_p

ओमानच्या विजयात लुधियानाच्या जतिंदरची चमक

Patil_p

सर्वोत्तम ऍथलिट्स पुरस्कारासाठी महिला, पुरुषांची यादी जाहीर

Patil_p
error: Content is protected !!