Tarun Bharat

भारतीय महिला हॉकी संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ ऑकलंड

राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात दणकेबाज विजयाची नोंद केली. कर्णधार राणीचे दोन गोल तर शर्मिला व नमिता टोप्पो (प्रत्येकी एक गोल) यांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला 4-0 असे नमवले. न्यूझीलंड दौऱयावर आलेला भारतीय महिला हॉकी संघ यजमानांविरुद्ध 4 तर इंग्लंडविरुद्ध 1 सामना खेळणार आहे.

प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया भारतीय महिला संघाने यजमान न्यूझीलंड संघाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. पहिल्या सत्रात राणीने शानदार गोल करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी घेऊन दिली. यानंतर, मध्यंतरापर्यंत भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्यांना एकही गोल नोंदवता आला नाही. मध्यंतरापर्यंत भारताकडे 1-0 अशी आघाडी कायम होती.

सामन्यातील तिसऱया सत्रात शर्मिलाने 33 व्या मिनिटाला तर राणीने 39 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवत भारताची आघाडी भक्कम केली. चौथ्या सत्रात नमिता टोप्पोने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यामुळे बॅकफूटवर गेलेल्या न्यूझीलंड महिला संघाला शेवटपर्यंत सामन्यात पुनरागमन करता आले नाही. भारतीय संघाने 4-0 अशी आघाडी कायम ठेवत शानदार विजय मिळवला. आता, उभय संघात दि. 26 रोजी दुसरा सामना होईल. 

 

Related Stories

यजमान न्यूझीलंडची विजयी सलामी

Patil_p

मिराबाई चानूला वैयक्तिक उच्चांकासह सुवर्ण

Patil_p

ब्राझीलला सलग दुसऱयांदा फुटबॉलचे सुवर्ण

Patil_p

बीसीसीआय 2 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करणार

Patil_p

भारत-श्रीलंका दिवस-रात्र कसोटी आजपासून

Patil_p

पाकची माजी महिला क्रिकेट कर्णधार सेना मिर कोरोना बाधित

Patil_p
error: Content is protected !!