Tarun Bharat

भारतीय मुष्टियुद्ध संघात देवेंद्रो, सुरंजॉयचे पुनरागमन

Advertisements

वृत्त संस्था/ नवी दिल्ली

चालू महिन्याच्या अखेरीस सर्बियातील बेलग्रेड येथे होणाऱया विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी सोमवारी राष्ट्रीय मुष्टियुद्ध फेडरेशनने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेते एम सुरंजॉय सिंग आणि एल देवेंद्रो सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेपूर्वी पतियाळा येथे सदर निवडण्यात आलेल्या भारतीय मुष्टीयुद्ध संघासाठी राष्ट्रीय सराव शिबिराला चालू आठवडय़ात प्रारंभ होणार आहे. सर्बियातील विश्व मुष्टियुद्ध स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या स्पर्धेत 100 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी होणार आहे.

पतियाळातील सराव शिबिरावेळी मुष्टियोद्धय़ांना प्रमुख प्रशिक्षक नरिदर राणा, माजी कनिष्ठ प्रशिक्षक एमएस ढाका, अनुभवी प्रशिक्षक धर्मेंद्र यादव, दिवाकर प्रसाद, टी. खेरपनश यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये 29 वर्षीय देवेंद्रो सिंग आणि 35 वर्षीय सुरंजॉय यांचे पुनरागमन झाले आहे.

2006 राष्ट्रकुल स्पर्धेत सुरंजॉयने सुवर्णपदक तसेच 2009 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. देवेंद्रो सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले होते. अलीकडेच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पाच पुरूष आणि चार महिलांनी आपला सहभाग दर्शविला होता. पण, भारताची महिला स्पर्धक लोव्हलिना बोरोगेनने एकमेव कास्यपदक मिळविले होते.

Related Stories

लेयॉन टेनिस स्पर्धेत सित्सिपस विजेता

Patil_p

कतार फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी अर्जेन्टिनाचे तिकीट निश्चित

Patil_p

शरथ कमल, बात्रा, साथियान पुढील फेरीत

Patil_p

पिछाडीवरून एफसी गोवाची नॉर्थईस्ट युनायटेडशी बरोबरी

Patil_p

आयपीएल फायनल दोन दिवसांनी लांबणीवर?

Patil_p

मदनलाल, गंभीर नवे सीएसी सदस्य

Patil_p
error: Content is protected !!