Tarun Bharat

भारतीय मेकअप आर्टिस्ट जगात भारी : विक्रम गायकवाड

  पुणे / प्रतिनिधी :

परदेशात त्वचेचा रंग एकतर गोरा किंवा काळा असतो, त्यामुळे त्यांना वेगवेगळय़ा त्वचेवर कशा पद्धतीचा मेकअप करावा याचे पुरेसे ज्ञान नसते. याउलट भारतात प्रत्येक प्रांतानुसार माणसाच्या त्वचेचा रंग, पोत, नाकाची ठेवण, केस सगळेच बदलते. या वैविध्यात भारतीय मेकअप डिझायनर घडतात. त्यामुळे फार आधुनिक प्रकारचा मेकअप न वापरताही मला ते श्रे÷ वाटतात, असे मत प्रसिध्द मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांनी व्यक्त केले.

‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 18 व्या ’पिफ’मध्ये गायकवाड यांचे ‘मेकअप डिझायनर- क्रिएटिंग ऍन इल्युजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

त्यांच्या या प्रवासातील किस्से सांगताना गायकवाड म्हणाले, ज्या काळात मी सुरुवात केली तेंव्हा तंत्रज्ञान फार पुढे गेलेले नव्हते व परदेशी साधनसामग्रीही सहज उपलब्ध होत नसे. त्यामुळे उपलब्ध साधनांमधूनच मार्ग शोधून काम करत असे. नाकासारख्या अवयवाला आकार देण्यासाठी मऊ केलेले मेण वापरणे, झाडांपासून मिळणारा चिक म्हणजे ‘लेटेक्स’ मागवून त्यापासून मास्क बनवणे, इत्यादी माध्यमातून मी काम करत राहिलो.

बऱयाचदा आपण खूप मेहनत घेतो मात्र, समोरच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आपण निराश होतो. पण त्यावेळी खचून न जाता टिकून राहिलो तरच आपण पुढे जाऊ शकतो. चित्रपट सुष्टीत तोंडी प्रसिद्धीने अधिक कामे मिळतात. त्यामुळे मला व्यक्तीधि÷ित पात्रांसाठी कामे मिळत गेली, असेही त्यांनी सांगितले.

मेकअप डिझायनरला त्याच्या कामात पूर्ण मोकळीक दिली तर तो चमत्कार घडवू शकतो. मात्र जेव्हा कलाकार त्यांची प्रतिमा, दिसणे याला चिकटून असतात तेव्हा काम करणे आव्हानात्मक असते. तरीही हे चित्र बदलले असून रणबीर कपूर, रणवीर सिंग यांच्यासारखे कलाकार मेकअप डिझायनरला समर्पित होऊन मेकअप करून घेताना दिसतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

सोलापूर जिल्ह्याला पुन्हा दिलासा ; 283 जण कोरोनामुक्त

Archana Banage

खा. सुधाकरराव शृंगारे यांच्याकडून नांदेड- लातूर महामार्ग दुरुस्तीची पहाणी

Archana Banage

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास : धैर्यशील मोहिते-पाटील

Archana Banage

जोतिबा देवदर्शन करून परतताना टेम्पो पलटी होऊन अपघात; १५ जण जखमी

Archana Banage

भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून उजनी पाईपलाईनचे काम गतीने करा : पालकमंत्री

Archana Banage

मंदिरे खुली करण्यासाठी भाविक वारकरी मंडळाचे भजन आंदोलन

Archana Banage