Tarun Bharat

भारतीय वंशाच्या डॉक्टराला महत्त्वाचे यश

भारतीय वंशाच्या अमेरिकन डॉक्टरने कोरोनाबाधितांच्या फुफ्फुसांना होणारे जीवघेणे नुकसान आणि अवयव निकामी होण्यापासून रोखण्यासाठी संभाव्य उपचाराचा शोध घेतला आहे. भारतात जन्मलेल्या आणि टेनेसीच्या सेंट ज्यूड चिल्ड्रन रिसर्च हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ. तिरुमला दवी कन्नेगांती यांचे यासंबंधीचे संशोधन सेल नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. उंदरावरील संशोधनादरम्यान कोरोना झाल्यावर पेशींना सूज येत अवयव निकामी होण्याचा संबंध ‘हायपरनइनफ्लेमेटरी’ प्रतिरोधशी असून यातून मृत्यू ओढवत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीपासून वाचविणाऱया संभाव्य औषधांची त्यांनी ओळख पटविली आहे.

सूजयुक्त पेशी मृत होण्याचे संदेश कशाप्रकारे प्रसारित होतात आणि त्या आधारावर ते रोखण्याच्या पद्धतीचे त्यांनी अध्ययन केले आहे. काम करण्याच्या पद्धती आणि सूज निर्माण करण्याच्या कारणांची माहिती उत्तम उपचार पद्धत विकसित करण्यास महत्त्वाची असल्याची सेंट ज्यूड रुग्णालयाच्या इम्यूनोलॉजी विभागशी संबंधित डॉ. कन्नेगांती यांनी म्हटले आहे.

कन्नेगांती यांचा जन्म तेलंगणात झाला आहे. त्यांनी वारंगलच्या काकतिय विद्यापीठातून रसायनशास्त्र, जंतूशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रातून पदवी प्राप्त केली होती. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली होती. 2007 मध्ये डॉ. कन्नेगांती टेनेसीमधील सेंट ज्यूड रुग्णालयात कार्यरत झाल्या होत्या.

नव्या संशोधनामुळे कोरोनाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. पेशींमध्ये सूज निर्माण करणाऱया व्यक्तीला मृत्यूच्या दारी नेणाऱया विशेष सायटोकीन्सची ओळख पटविली असल्याचे त्या म्हणाल्या. या संशोधनात श्रद्धा तुलाधर, पीरामल समीर, मिन झेंगे, बालामुरुगन सुंदरम, बालाजी भनोत, आर.के. सुब्बाराम मलिरेड्डी यांचाही समावेश होता.

Related Stories

स्वीस बँकेकडून मिळणार महत्त्वाची माहिती

Patil_p

5 दिवसांमध्ये 50 राज्यांची टूर

Patil_p

कॅनडामध्ये सोमवारी सार्वत्रिक निवडणूक

Patil_p

पुन्हा संक्रमणाची जोखीम कमी

Patil_p

तबलिगींकडून पाकिस्तानातही कोरोनाचा फैलाव

prashant_c

नाईट क्लब गोळीबारात अमेरिकेत दोन ठार

Patil_p