Tarun Bharat

भारतीय विद्या भवनमध्ये ५ जानेवारी रोजी ‘अभिनयमाला’

पुणे / प्रतिनिधी  : 
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ अभिनयमाला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
रविवार, ५ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.’स्वरदा परफॉर्मिंग आर्टस् अँण्ड रिसर्च सेंटर ‘ प्रस्तुत  या कार्यक्रमात ६ नृत्यांगना या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आणि समकालीन विषयांवर आधारित नृत्य संरचना  सादर करणार आहेत.
कोहिनूर दर्डा, नेहा भाटे, श्रुती पत्की, नेहा मुथियान, मुग्धा तिवारी, रसिका गुमास्ते  या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ९७ वा कार्यक्रम आहे. 

Related Stories

सोलापूर : कोयत्याच्या धाकाने दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या तिघांना अटक

Archana Banage

सोलापूर शहरात ६० नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

Archana Banage

सोलापुरात शुक्रवारी साजरी होणार ‘रमजान ईद’

Archana Banage

डॉ.अमोल सप्तर्षी, मकरंद टिल्लू यांना महाराष्ट्र ब्राह्मण संस्थेचे पुरस्कार जाहीर

prashant_c

बार्शी तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायत निवडणूक रद्द

Archana Banage

सोलापूर : पोलीस उप निरीक्षक महादेव दरेकर यांचे निधन

Archana Banage