Tarun Bharat

भारतीय व्यावसायिकाचे काबूलमध्ये अपहरण

काबूल

 अफगाणिस्तान वंशाचे भारतीय नागरिक बंस्रीलाल अरेन्डेह यांचे काबूलमध्ये बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. पुनीत सिंह चंडोक यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बंदुकीच्या धाकावर अफगाण वंशाच्या भारतीय नागरिकाचे तालिबानने त्याच्या दुकानाजवळून अपहरण करण्यात आले आहे. त्यानंतर आता या घटनेबाबत भारत सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी याविषयी माहिती दिली.

बंस्रीलाल हे औषध उत्पादनांचे व्यापारी आहेत आणि या घटनेवेळी ते त्यांच्या कर्मचाऱयांसह त्यांच्या दुकानात काम करत होते. बंस्रीलाल यांचे त्यांच्या कर्मचाऱयांसह अपहरण करण्यात आले होते. पण त्यांचे कर्मचारी पळून जाण्यात यशस्वी झाले. तरीही त्यांना अपहरणकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केली, असे चंडोक यांनी सांगितले. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा खरा चेहरा आता जगासमोर येण्यास सुरूवात होत आहे. कारण त्यांना विरोध करणाऱयांना शोधून संपविण्याचा प्रयत्न सध्या करत आहे. त्याचेच एक उदाहरण आता उघड झाले आहे.

Related Stories

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमधून बाहेर

prashant_c

रशियाकडून आणखी काही शहरांवर ताबा

Patil_p

युरोपमध्ये संसर्ग तीव्र

Patil_p

श्रीलंकेत गोहत्येवर बंदी घालण्याची तयारी

Patil_p

जर्मनीत रूग्णवाढ

Patil_p

ब्राझीलमध्ये 8.5 लाखाहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav