Tarun Bharat

भारतीय शास्त्रज्ञाने शोधली कोरोनावर लस

 ऑनलाईन टीम / सिडनी :

ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय असलेल्या एका शास्त्रज्ञाने कोरोना विषाणूवर लस शोधण्याच्या आपण अगदी जवळ आल्याचा दावा केला आहे. कॉमनवेल्थ सायंटिफिक ऍन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या एका हाय सेक्युरिटी प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात येत आहे. सीएसआयआरओचे पॅथोजन्स चमूचे प्रमुख प्राध्यापक एस. एस. वासन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली.

कोरोना या जीवघेण्या विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत 630 लोकांचा बळी घेतला आहे. तर 30 हजार लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. इतर देशातील लोकांनाही या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ यावर लस शोधत आहेत. त्यातच वासन यांनी कोरोनावरील लस शोधण्याच्या आपण अगदी जवळ आल्याचे म्हटले आहे. त्यांना संशोधनासाठी सर्व आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तसेच ऑस्ट्रेलियन ऍनिमल हेल्थ लॅबमध्येही माझे सहकारी यावर निदान, सर्व्हिलन्स आणि रेस्पॉन्सवर काम करत आहेत. प्री-क्लिनिकल अभ्यास करून कोरोनावर लवकरच औषध तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Related Stories

रेल्वेचा सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास

Patil_p

‘आप’ उमेदवारी यादी जाहीर

Patil_p

चीनला किंमत फेडावी लागणार

Patil_p

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल होणार Twitter चे CEO; भारतीयांचा दबदबा कायम

Abhijeet Khandekar

आंध्रप्रदेशात तेल टँकरच्या सफाईदरम्यान 7 कामगारांचा मृत्यू

Amit Kulkarni

संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबाबतचे ‘ते’ विधान मागे

prashant_c