Tarun Bharat

भारतीय संघाचा नेटमध्ये कसून सराव

Advertisements

वृत्तसंस्था/ सेंच्युरिन

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर नेटमधील सरावाला कसून प्रारंभ केला आहे. 26 डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे.

या दौऱयामध्ये उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे मर्यादित षटकांची मालिकाही होणार आहे. भारतीय संघातील सर्व क्रिकेटपटूंनी येथील सुपर स्पोर्टस् पार्कच्या मैदानावर प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली बराचवेळ कसून सराव केला. पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला सरावासाठी कोणताही सामना आयोजित केलेला नाही त्यामुळे त्यांचे लक्ष अधिक सरावावर राहील. जोहान्सबर्गमध्ये भारतीय संघाचे गुरूवारी आगमन झाले. त्यानंतर दोन दिवसांच्या कालावधीने भारतीय खेळाडूंनी आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे.

Related Stories

दुबई स्पर्धेतून रॉजर फेडररची माघार

Patil_p

अन् 437 दिवसानंतर धोनी मैदानात उतरला!

Patil_p

माजी फुटबॉलपटू सईद हकीम यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p

मराठा आरक्षणप्रश्नी उद्या पुन्हा सुनावणी

Patil_p

विंडीजचा बांगलादेशवर मालिकाविजय

Patil_p

महिला बॉक्सर मेयरला कोरोनाची बाधा

Patil_p
error: Content is protected !!