Tarun Bharat

भारतीय संघाला 60 टक्के दंड

वृत्तसंस्था/ रायपूर

हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने भारतीय संघाला 60 टक्के मानधन कपातीचा दंड करण्यात आला आहे.

सामनाधिकारी जावगल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली असून भारताने निर्धारित वेळेत तीन षटके कमी टाकल्याचे त्यांनी सांगितले. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार एका षटकासाठी 20 टक्के मानधनकपातीचा दंड करण्यात येतो. कर्णधार रोहित शर्माने अपराध व कारवाई मान्य केली असल्याने औपचारिक सुनावणी घेण्यात आली नाही. मैदानी पंच, तिसरे व चौथे पंच यांनी या संदर्भात अहवाल दिला होता.

Related Stories

बांगलादेशचा तमिम इक्बाल कसोटी मालिकेतून बाहेर

Patil_p

स्पर्धा रद्द, तरीही विम्बल्डन बक्षीस रक्कम प्रदान करणार

Patil_p

मोहमद शमीच्या जागी उमेश यादव

Patil_p

भारत 5 बाद 98 वरुन 7 बाद 338

Patil_p

लॉकडाऊन कसोटी मालिकेसाठी पथ्यावरच पडेल!

Patil_p

सूर्या बनला टी-20 मधील ‘नंबर वन’ फलंदाज

Patil_p