Tarun Bharat

भारतीय सीमेवर तैनात, चिनी सैनिकाला रडू आवरेना

चित्रफितीद्वारे केला जातोय दावा :

वृत्तसंस्था / तैपैई

लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. दोन्ही देश या दुर्गम भागात हिवाळा तोंडावर आला तरीही स्वतःच्या सैनिकांची तैनात दिवसेंदिवस वाढवत आहेत. याचदरम्यान चिनी सैनिकांची एक चित्रफित वेगाने प्रसारित होत आहे. हे सैनिक भारत सीमेवर स्वतःची तैनात झाल्याने रडत असल्याचा दावा या चित्रफितीद्वारे करण्यात आला आहे. ही चित्रफित यापूर्वी वीचॅट या चिनी समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आली होती. परंतु बेइज्जत होण्याच्या भीतीने चिनी प्रशासनाने ती डिलिट करण्यात आली होती.

ही चित्रफित फूयांग रेल्वेस्थानकावर जाताना बसमध्ये तयार करण्यात आली होती. सैन्यात दाखल या नव्या सैनिकांना तेथील प्रशिक्षणानंतर भारताला लागून असलेल्या सीमेवर तैनात करण्यासाठी पाठविले जात होते. या चिनी सैनिकानां तत्पूर्वी हुबेई प्रांतातील एका सैन्यतळावर नेले जाणार होते. तेथूनच त्यांची तैनात भारतीय सीमेवर होणार होती असा दावा तैवान न्यूजकडून करण्यात आला आहे.

ही चित्रफित सर्वप्रथम फूयांग सिटी वीकलीच्या वीचॅट पेजवर पोस्ट करण्यात आली होती. परंतु नंतर अपमानाच्या भीतीने ही चित्रफित लवकरात लवकर हटविण्यात आली होती. फूयांग सिटी वीकलीच्या पोस्टमध्ये चीनच्या अनहुई प्रांताच्या यिंगझोउ जिल्हय़ातील रहिवासी असलेल्या या 10 नव्या सैनिकांना दाखविण्यात आले होते. हेच सैनिक चित्रफितीत रडताना दिसून येत आहेत.

बळजबरीची भरती

चित्रफितीत दिसून येणारे हे चिनी सैनिक अद्याप महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. त्यांच्यापैकी 5 सैनिक तिबेटमध्ये सेवा करण्यासाठी स्वयंसेवक राहिले आहेत. चित्रफितीत चिनी सैनिक अडखळत्या आवाजात चिनी सैन्य पीएलएचे गीत ग्रीन फ्लॉवर्स इन द आर्मी म्हणताना दिसून येतात. त्यांच्या रडण्यामुळे त्यांच्या तोंडातून आवाजच बाहेर पडत नव्हता.

चिनी सैनिकांमध्ये भीतीचे वातावरण

गलवान येथे भारतीय सैन्यासोबत 15 जून रोजी झालेल्या हिंसक झटापटीनंतर चिनी सैनिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनचे सैनिक भारतीय सैनिकांना आव्हान देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. याचे नवे उदाहरण पँगोंग सरोवराच्या दक्षिण काठावर दिसून आले आहे. भारतीय सैन्याने तेथील सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण अनेक शिखरांवर कब्जा केला आहे.

Related Stories

दिल्लीतील कोरोना दिवसभरात 20 नवे रूग्ण 36 जणांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

भारताने 14 हजार फूट उंचीवर तैनात केले सहा टी-90 रणगाडे

datta jadhav

सरकारी कर्मचाऱयांच्या अनावश्यक खर्चाला आळा

Patil_p

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त

Amit Kulkarni

चीनने आक्रमकपणा दाखविल्यास जशास तसे उत्तर द्या…

datta jadhav

नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा हक्क नाही!

Patil_p