Tarun Bharat

भारतीय सैनिकांकडून गलवान व्हॅलीमध्ये नवीन वर्ष साजरे

Advertisements

नवी दिल्ली / प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली येथे तिरंग्याबरोबर लष्करी जवानांचे फोटो मंगळवारी सुरक्षा एजन्सनी प्रसिद्ध केल्या.

चीनच्या शासकिय माध्यमांनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैनिकांनी गलवान व्हॅली जवळील एका ठिकाणाहून चिनी लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविल्याचा व्हिडिओ प्रदर्शित केल्यानंतर तीन दिवसांनी ही छायाचित्रे प्रसिद्ध झाली. एका फोटोमध्ये जवळपास ३० भारतीय सैनिक राष्ट्रध्वजासह दिसत होते. दुसर्‍या फोटोमध्ये त्यांच्यापैकी चौघांनी राष्ट्रध्वज धारण केलेला गट तसेच निरीक्षण चौकीला लागून असलेल्या ध्वजध्वजावर अजून एक तिरंगा फडताना दिसला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ही छायाचित्रे 1 जानेवारी रोजी गलवान खोऱ्यात घेण्यात आली होती. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या ट्विटरवर “#NewYear2022 निमित्त गलवान व्हॅलीमधील शूर भारतीय लष्करी सैनिक” या मथळ्यासह छायाचित्रे देखील पोस्ट केली आहेत.

Related Stories

देशात लसीकरणाचा आकडा 50 कोटींवर

Patil_p

अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणुक झाल्यास तक्रार करा-जिल्हा उपनिबंधक

Sumit Tambekar

नितीशकुमार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

datta jadhav

कुमार विश्वास यांच्यावर एफआयआर

Patil_p

कमर्शियल सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त

Patil_p

महाकाय शार्क माशाचे प्राण वाचवण्यात यश

Amit Kulkarni
error: Content is protected !!