Tarun Bharat

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना व समाजवादी नायिकाना शहरात अभिवादन

प्रतिनिधी/ सातारा

दरवर्षी देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात तिरंगा फडकवून आणि घरोघरी गोड-धोड बेत करत अर्थात केसरी जिलबी खात सातारा जिल्हावासिय साजरा करतात .मात्र यावर्षी प्रथमच शहरातील इंग्रजी माध्यमातून मुला-मुलींना शिक्षणाचे धडे देणाया गुरुकुल स्कूलच्या वतीने सातारा शहरात दोन दिवस अगोदरच भव्य फलक झळकले आणि ते म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये विशेष योगदान देणाया महिला स्वातंत्र्य सेनानी आणि समाज वादी  नायिकाचे .

गुरुकुल स्कूलच्या वतीने नेहमीच आगळेवेगळे उपक्रम राबविले जातात .यामध्ये स्कूलचे प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र चोरगे यांच्या अभिनव कल्पनातून यावर्षी सातारा शहरातील प्रमुख चौकांमध्ये तसेच राजपथावर देशाच्या कन्या या मथळ्याखाली कस्तुरबा गांधी, राजमाता जिजाबाई ,अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, लक्ष्मी पंडित, कमला नेहरू, सरोजिनी नायडू ,अरुणा असफअली, भिकाजी कामा बेगम हजरत महाल, चक्रवर्ती राजगोपालाचारी या दहा  विरांगना   यांची भव्य पोस्टर्स अभिवादन अर्थ लावण्यात आलेली आहेत. स्वातंत्र काळात देशासाठी विशेष योगदान देणाया आणि प्रतिसरकार स्थापन केलेल्या सातायात ऐतिहासिक परंपरा मोठी असून याच साताया ने या  महिला स्वातंत्र्य सेनानी  स्मरणार्थ उभारलेले हे फलक खरोखरच मार्गदर्शक आणि स्वातंत्र्य योद्ध्यांना अभिवादन अभिवादनासाठी उभारलेले औचित्यपूर्ण कार्य असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त करुन गुरुकुल स्कूलच्या या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Related Stories

‘मातोश्री’ला 2 कोटी अन् 50 लाखांचं घड्याळ; यशवंत जाधवांची गुप्त डायरी सापडली

datta jadhav

पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाऊन करा ; मुंबई हायकोर्टाची मुख्यमंत्र्यांना सूचना

Archana Banage

मुगळीच्या युवकाकडून गावठी पिस्तुल, काडतुसे जप्त

Archana Banage

Satara; स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवातही रुग्णांना घ्यावा लागतोय ‘ढालग्याच्या अ‍ॅम्ब्युलन्स’चा आधार

Abhijeet Khandekar

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीनकाका पाटील

Patil_p

कोरोना संक्रमित सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

Archana Banage