Tarun Bharat

भारतीय हॉकी संघाचा अर्जेंटिनावर विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या सुरू असलेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील सोमवारी खेळविण्यात आलेल्या परतीच्या दुसऱया सामन्यात मनदीप सिंगच्या निर्णायक गोलाच्या जोरावर यजमान भारताने अर्जेंटिना संघावर 4-3 अशा गोलफरकाने निसटता विजय पटकाविला.

अर्जेंटिना संघाने 2016 च्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. अर्जेंटिना संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला होता. भारताने या पराभवाची परतफेड सोमवारच्या परतीच्या सामन्यात केली. या सामन्यात भारतातर्फे जुगराज सिंगने दोन गोल तर मनदीप सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात भारताच्या बचावफळीतील वरूणकुमारची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

या परतीच्या सामन्यात पहिल्या 15 मिनिटाच्या कालावधीत दोन्ही संघांना  आपले खाते उघडता आले नाही. मात्र त्यानंतर दुसऱया 15 मिनिटाच्या सत्रामध्ये भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हार्दिक सिंगने भारताचे खाते उघडले. यानंतर तीन मिनिटांच्या कालावधीत भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला व जुगराज सिंगने भारताचा दुसरा गोल नोंदविला. जुगराज सिंगचा हा चौथा आंतरराष्ट्रीय गोल आहे. माध्यंतरापर्यंत भारताने अर्जेंटिनावर 2-0 अशी आघाडी घेतली होती.

सामन्यातील 40 व्या मिनिटाला निकोलास टोरेने पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटिनाचे खाते उघडले. 42 व्या मिनिटाला अर्जेंटिनाने पेनल्टी स्ट्रोकवर दुसरा गोल करून भारताशी बरोबरी साधली. यानंतर भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला व जुगराज सिंगने भारताचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. सामना संपण्याला 8 मिनिटे बाकी असताना भारताने अर्जेंटिनावर 3-2 अशी अघाडी घेतली होती. 56 व्या मिनिटाला मार्टिन फेरेरोने अर्जेंटिनाचा तिसरा गोल करून सामन्यात रंगत आणली. 26 सेकंद बाकी असताना मनदीप सिंगने भारताचा चौथा आणि निर्णायक गोल नोंदवून अर्जेंटिनाचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले.

Related Stories

भुवनेश्वरमधील स्पर्धेतून इंग्लंडची माघार

Patil_p

मुरलीधरनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p

लखनौ-आरसीबी ‘सुप्रीमसी बॅटल’ आज

Patil_p

पानिपत : नीरज चोप्राची तब्येत पुन्हा बिघडली; रूग्णालयात दाखल

Tousif Mujawar

नमन ओझा क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत गुवाहाटीत दाखल

Patil_p
error: Content is protected !!