Tarun Bharat

भारतीय हॉकी संघाला कोरोना लसीचा पहिला डोस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱया पीआर श्रीजेशच्या नेतृत्त्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्व खेळाडूंना गुरुवारी बेंगळूरमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

भारतीय पुरुष हॉकी संघ बेंगळूरमधील साईच्या केंद्रामध्ये सराव करीत आहे. येत्या जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱया टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱया भारतीय पथकातील सर्व खेळाडूंना कोरोनाची लस देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. अलीकडेच भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि प्रशिक्षक वर्गातील दोन सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती. बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये या कोरोनाबाधित व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. राणी रामपाल, सविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशीला यांना कोरोनाची लागण झाली आहे. टोकिओ ऑलिम्पिकसाठी पूर्वतयारीला भारतीय महिला हॉकी संघाने यापूर्वीच प्रारंभ केला आहे. मध्यंतरी त्यांना सराव शिबिरावेळी 10 दिवसांची विश्रांती देण्यात आली होती. कोरोनाबाधित महिला हॉकीपटूंना कमी कालावधीसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Related Stories

पोलंडची स्वायटेक सर्वोत्तम

Omkar B

मिल्खा बस दौडता नही, उडता है!

Patil_p

नीक पॉप न्यू कॅसलशी करारबद्ध

Patil_p

विजयासह ‘प्लेऑफ’ स्थान गाठण्यास मुंबई इंडियन्स सज्ज

Patil_p

अबु धाबी टेनिस स्पर्धेतून एलिस मर्टेन्सची माघार

Patil_p

नॉर्वेचा कास्पर रूड विजेता

Patil_p