Tarun Bharat

भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

वृत्त संस्था/ भुवनेश्वर

येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान, विद्यमान विश्वविजेत्या भारताने शनिवारी झालेल्या सामन्यात पोलंडचा 8-2 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

शनिवारच्या सामन्यात भारतीय संघातील संजयकुमार,अर्जित सिंग हुंडाल आणि सुंदीप चिरमाको यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले. या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात हॅट्ट्रीक्स नोंदविणारा भारतीय संघाचा उपकर्णधार संजयकुमारने शनिवारच्या सामन्यात चौथ्या आणि 58 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. अर्जित सिंग हुंडालने आठव्या आणि 60 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. सुंदीपने 24 व्या आणि 40 व्या मिनिटाला असे दोन गोल केले.

उत्तम सिंगने 34 व्या मिनिटाला तर शारदानंद तिवारीने 38 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. ब गटातील या सामन्यात पोलंडतर्फे रूटकोव्हेस्कीने 50 व्या तर पॉलेकने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले. आता भारताचा या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना बेल्जियमविरुद्ध 1 डिसेंबरला होणार आहे. गेल्या विश्वचषक कनिष्ठांच्या हॉकी स्पर्धेत बेल्जियम उपविजेता ठरला होता. अ गटातील बेल्जियमने सरस गोल सरासरीच्या जोरावर मलेशियाला मागे टाकत 7 गुणांसह अग्रस्थान मिळविले आहे.

या स्पर्धेत भारताला सलामीच्या सामन्यात फ्रान्सकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भारताने दुसऱया सामन्यात कॅनडाचा 13-1 असा दणदणीत पराभव केला होता. या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अन्य सामन्यात पाकिस्तानने ड गटातील लढतीत इजिप्तचा 3-1 असा पराभव केला. फ्रान्सने कॅनडाचा 11-1 असा पराभव करत अ गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. मलेशियाने दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव करत अ गटातून उपांत्यपूर्व फेरीत गाठली. अ गटात बेल्जियमने आघाडीचे स्थान मिळविताना चिलीचा 3-0 असा पराभव केला.

Related Stories

दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू मुंबईत दाखल

Patil_p

आनंदचा सलग पाचवा पराभव

Patil_p

पंजाबचा हैदराबादवर निसटता विजय

Patil_p

टोकियोमध्ये आणीबाणी लागू; प्रेक्षकांच्या अनुपस्थित होणार ऑलिम्पिक स्पर्धा

Archana Banage

हार्दिक पंडय़ाने स्पर्धेत गोलंदाजी का केली नाही?

Omkar B

रविंद्र जडेजा टी-20 वर्ल्डकपमधूनही बाहेर?

Patil_p
error: Content is protected !!