Tarun Bharat

भारती एअरटेलकडून अवादात 5 टक्के वाटा खरेदी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल यांनी सोलार ऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एमएचबुलढाणा कंपनीतील 5.2 टक्के इतका वाटा खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. हा खरेदी करार 4.55 कोटी रुपयांना रोखीने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अवादा एमएचबुलढाण प्रायव्हेट लिमिटेड ही नव्याने स्थापलेली कंपनी महाराष्ट्रात सोलार ऊर्जा निर्मितीच्या कार्यात भाग घेणार आहे. मार्च 2021 पासून कंपनीचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडची वरील कंपनी सहकारी कंपनी आहे. कंपनी 1 गिगावॅटचा सोलार ऊर्जा आणि पवन ऊर्जा प्रकल्पांचे काम देशभरात सुरू करणार आहे. दोन्ही कंपन्यांमधील वाटा खरेदीबाबतचा व्यवहार 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

झोमॅटोचा नाइलाजास्तव आयपीओ?

Patil_p

इलेक्ट्रिक वाहन विक्रीत 20 टक्क्यानी वाढ

Patil_p

झीप इलेक्ट्रिकची पाचपट उलाढाल होणार

Patil_p

एचडीएफसी बँक सुरू करणार 207 शाखा

Amit Kulkarni

गेलचे समभाग 5 टक्के वधारले

Patil_p

बाजारात दुसऱया सत्रात नुकसान भरपाई

Patil_p