Tarun Bharat

भारती शिपयार्ड ठेकेदारांचे रखडलेल्या बिलांसाठी आंदोलन

Advertisements

दापोली / प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील दाभोळ परिसरातील उसगांव येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये सिव्हील फेब्रिकेशन, वॉटर सप्लाय, खडी, रेती सप्लाय, व्हिजिटेबल सप्लाय, इंटेरिअर, लेबर सप्लाय आदी छोटी मोठी कामे भारती शिपयार्ड कंपनी स्थानिक ठेकेदारांकडून करून घेत होती. मात्र आता कंपनीने या ठेकेदारांची देणी थकवल्याने ठेकेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

या करिता आयोजित पत्रकार परिषदेत ठेकेदारांच्या वतीने बोलताना दाभोळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत खेडेकर म्हणाले की, सर्व ठेकेदार पूर्णपणे हतबल झाल्याने यापुढे कंपनीतील कोणतीही वस्तु ठेकेदारांचे पेमेंट झाल्याशिवाय कंपनीच्या बाहेर नेऊ देणार नाही. तसेच इतर कोणती दुसरी कंपनी येथील जागा भाडेतत्वावर अथवा विकत घेत असेल तर ठेकेदार स्वतःची बीले मिळाल्याशिवाय त्याही गोष्टीला विरोध करेल. त्याचाच एक भाग म्हणून अनेक वर्ष झालेल्या अन्यायाच्या विरोधात सर्व स्थानिक
ठेकेदार २८ ऑक्टोबर २०२० रोजी तहसीलदार कार्यालयाच्या समोर एक दिवसांचा आत्मक्लेश उपोषण करणार आहे असे या वेळी जाहीर करण्यात आले.

Related Stories

फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न

Abhijeet Shinde

मिरकरवाडा येथे नेपाळी खलाशाचा खून

Patil_p

खेडमध्ये राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

Patil_p

कणकवली रुग्णालय तूर्तास ‘डेंजर झोन’मधून बाहेर

NIKHIL_N

पुणे विभागात 1 हजार 457 रुग्ण; आतापर्यंत 88 मृत्यू

Abhijeet Shinde

घरी परतत असलेल्या मजुरांच्या तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून

Rohan_P
error: Content is protected !!