Tarun Bharat

भारत-अमेरिका युद्धाभ्यासात कोरोनाची एंट्री

Advertisements

वृत्तसंस्था/ बिकानेर

राजस्थानच्या बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये भारत आणि अमेरिकेचे सैनिक युद्धाभ्यास करत आहेत. यात अमेरिकेचे 240 सैनिक सामील झाले आहेत. यातील 14 सैनिकांचा मंगळवारी कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. अमेरिकेचा एक सैनिक कोरोनाबाधित आढळला असून भारताच्या 13 सैनिकांचा अहवाल निगेटिव्ह आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या अमेरिकेच्या सैनिकाला आयसोलेट करण्यात आले आहे. सोमवारी सुरू झालेला हा युद्धाभ्यास 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

अमेरिकेतून भारतात आलेल्या सैनिकाच्या तपासणीदरम्यान कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. हा सैनिक पूर्वीपासूनच आयसोलेट आहे. त्याचा कुणाशीच संपर्क आलेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या या युद्धाभ्यासापूर्वी आरोग्याशी संबंधित सर्व प्रक्रियांची पूर्तता केली जात असल्याची माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल अमिताभ शर्मा यांनी दिली आहे.

 संयुक्त युद्धाभ्यासत अमेरिकेचे पुरुष तसेच महिला सैनिक सामील आहेत. या सर्वांची यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यानंतरच भारतात येण्याची मंजुरी देण्यात आली होती. अमेरिकेच्या पथकात 2 इन्प्रंटी बटालियन, 3 इन्प्रंटी रेजिमेंट, 1-2 स्ट्रायकर ब्रिगेड कॉम्बॅट टीमचे सैनिक आहेत. या युद्धाभ्यासात इन्प्रंटीची कॉम्बॅट व्हेईकल आणि हेलिकॉप्टर्स भाग घेत आहेत.

Related Stories

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 614 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

Patil_p

भारतात मागील 24 तासात 8171 नवे कोरोना रुग्ण, 204 मृत्यू

datta jadhav

नवी दिल्ली : लाजपत नगर मार्केटमधील कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग

Rohan_P

हिमाचलमध्ये 8 शहरात तापमान ‘शून्या’खाली

Patil_p

हिंदू दलित पतीचे मुस्लीमांकडून ‘ऑनरकिलींग’

Amit Kulkarni

पँगाँग भागात चीन उभारतोय पूल

Sumit Tambekar
error: Content is protected !!