Tarun Bharat

भारत-अमेरिकेत उद्या ‘टू प्लस टू’ चर्चा

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोनाचे आव्हान, बदलती जागतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती व संरक्षण सज्जता या मुद्द्यांवर उद्या (दि.27) भारत आणि अमेरिकेत ‘टू प्लस टू’ नावाने चर्चा होणार आहे. 

नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये होणाऱ्या या चर्चेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तर अमेरिकेकडून त्यांचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर व परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ सहभागी होणार आहेत. चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज माईक पोम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर दिल्ली येथे पोहोचले आहेत. 

उद्या होणाऱ्या बैठकीपूर्वी आज (सोमवारी) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दरम्यान, हे दोन्ही नेते पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत.

Related Stories

नॅन्सी पेलोसींच्या तैवान दौऱयाला प्रारंभ

Patil_p

तामिळनाडूतील दोन गावांना जैवविविधतेच्या प्रतिकांचा दर्जा

Patil_p

विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱया आरोपीला अटक

Patil_p

सीबीआयच्या माजी संचालकांचे कोरोनाने निधन

datta jadhav

पै.पृथ्वीराज पाटीलची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Archana Banage

दिल्ली परिसरात ‘अग्नितांडव’ सुरूच

Amit Kulkarni