Tarun Bharat

भारत अर्जेंटिना आज महत्त्वाचा उपांत्य सामना

वृत्तसंस्था/ टोकियो

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने दर्जेदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. आता या क्रीडाप्रकारात बुधवारी भारत आणि अर्जेंटिना यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. अर्जेंटिनाला पराभूत करण्याची क्षमता भारतीय संघामध्ये निश्चितच आहे.

ऑलिंपिकच्या इतिहासात महिला हॉकीमध्ये यावेळी भारतीय महिला हॉकी संघाने अपेक्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत पहिल्यांदाच मजल मारली आहे. या क्रीडाप्रकारातील सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढय़ ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या सामन्यातील एकमेव गोल 22 व्या मिनिटाला भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला होता. ऑस्ट्रेलियन महिला संघाने यापूर्वी तीनवेळा विजेतेपद मिळविले होते. 1980 च्या मॉस्को ऑलिंपिक नंतर भारतीय हॉकी संघाची पहिल्यांदाच या क्रीडाप्रकारात दर्जेदार कामगिरी झाली आहे.

अर्जेंटिना महिला हॉकी संघाने 2000 सालातील सिडनी आणि 2012 च्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदके मिळविली होती. यावेळी अर्जेंटिनाचा संघ महिला हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. 2012 नंतर पहिल्यांदाच अर्जेंटिना संघाने ऑलिंपिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाने 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या जर्मनीचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

अलिकडच्या कालावधीत भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील कामगिरीचा आढावा घेतल्यास अर्जेंटिनाचा संघ थोडा अधिक सरस वाटतो. या दोन संघामध्ये पाच  सामने खेळविले गेले. भारतीय महिला संघाने अर्जेंटिना युवा संघाबरोबरचे दोन सामने बरोबरीत राखले. त्यानंतर अर्जेंटिनाच्या दौऱयात भारताने अर्जंटिना ब संघाबरोबर दोन सामने खेळले असून ते भारताने गमविले. बुधवारच्या सामन्यात भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल, असा विश्वास कर्णधार राणी रामपालने व्यक्त केला आहे.

Related Stories

इटलीच्या बेरेटिनीची अंतिम फेरीत धडक

Patil_p

झिंबाब्वेचा स्कॉटलंडवर मालिका विजय

Patil_p

खेळाडूंच्या हॉटेलपासून अवघ्या 30 किलोमीटर्स अंतरावर विमान कोसळले!

Patil_p

कर्नाटकाकडून सेनादलाला पराभवाचा धक्का

Patil_p

इंग्लंडचा लंकेवर मालिका विजय

Amit Kulkarni

लंका-हॉलंड यांच्यात आज शेवटचा पात्रता सामना

Amit Kulkarni