Tarun Bharat

भारत-अर्जेंटिना हॉकी सामना बरोबरीत

वृत्तसंस्था / ब्यूनॉस आयर्स

सध्या भारतीय पुरूष हॉकी संघ अर्जेंटिनाच्या दौऱयावर असूक बुधवारी या दौऱयातील झालेल्या दुसऱया सराव सामन्यात भारताने ऑलिंपिक विजेत्या यजमान अर्जेंटिनाला 4-4 असे गोल बरोबरीत रोखत अर्जेंटिनाने भारताला सलग दुसऱया विजयापासून रोखले.

या दौऱयात भारताने अर्जेंटिनाचा पहिल्या सरावाच्या सामन्यात 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला होता. बुधवारच्या दुसऱया सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी आक्रमक आणि दर्जेदार खेळ करत पूर्वार्धात तीन गोल करत अर्जेंटिनावर आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारत भारताला विजयापासून रोखत हा सामना बरोबरीत सोडविला.

या दुसऱया सामन्यात भारतातर्फे वरूणकुमारने सातव्या आणि 44 व्या मिनिटाला, राजकुमार पालने 13 व्या मिनिटाला आणि रूपिंदर पाल सिंगने 14 व्या मिनिटाला गोल केले. अर्जेंटिनातर्फे  लिनाद्रो टॉलीनीने दहाव्या मिनिटाला, लुकास टोस्केनीने 23 व्या मिनिटाला, इग्नेसिओ ओरिझने 42 व्या आणि लुकासने 57 व्या मिनिटाला गोल केले. मध्यंतरापर्यंत भारताने अर्जेंटिनावर 3-2 अशी आघाडी मिळविली होती. आता या दौऱयातील आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग स्पर्धेतील भारताचा सामना 11 एप्रिलला अर्जेंटिनाबरोबर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दीड वाजता प्रारंभ होईल.

Related Stories

पाकचा उमर गुल निवृत्त

Patil_p

पॅरा नेमबाज अवनी लेखराला रौप्यपदक

Patil_p

क्रीडामंत्र्यांच्या हस्ते नाडा ऍपचा शुभारंभ

Patil_p

पाक संघाचे इंग्लंडला प्रयाण

Patil_p

रबाडा-नोर्त्झेचे आगमन, पहिल्या सामन्यातून मात्र बाहेर

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सचा 60 धावांनी विजय

Patil_p