Tarun Bharat

भारत-आयर्लंड यांच्यात आज पहिली टी-20

Advertisements

मॅलाहिदे / वृत्तसंस्था

अष्टपैलू हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज (रविवार दि. 26) आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात युवा खेळाडूंना आजमावण्यावर भर देणे अपेक्षित आहे. दोन सामन्यांची ही छोटेखानी मालिका डबलिनमध्ये होईल. आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9 वाजता सुरुवात होणार आहे.

आयर्लंडचा संघ यापूर्वी मागील सलग पाचही सामने जिंकत बहरात राहिला. मात्र, भारतासमोर ही घोडदौड कायम राखण्यासाठी त्यांना नशिबावर हवाला ठेवावा लागेल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत कर्णधार हार्दिक पंडय़ाने नेतृत्वामुळे सर्वोत्तम कामगिरी साकारता आल्याचे यावेळी नमूद केले.

संभाव्य संघ

भारत ः ऋतुराज गायकवाड, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, यजुवेंद्र चहल.

आयर्लंड ः पॉल स्टर्लिंग, स्टीफन डॉहनी, ऍन्डय़्रू बॅल्बिर्न, गॅरेथ डेलॅनी, कर्टिस कॅम्फर, ऍन्डय़्रू मॅकब्रिन, जॉर्ज डॉकरेल, बॅरी मॅकर्थी, हॅरी टेक्टर, लॉरकॅन टकर, क्रेग यंग.

सामन्याची वेळ ः रात्री 9 वा. थेट प्रक्षेपण ः सोनी नेटवर्क.

Related Stories

नाडाच्या शिस्तपालन समितीत अखिल कुमारचा समावेश

Patil_p

चौथ्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरला

Patil_p

मनिका बात्राला कांस्यपदक

Patil_p

दबंग दिल्ली, बेंगळूर बुल्स, बंगाल वॉरियर्सचे विजय

Patil_p

के. एल. राहुलला दंड

Patil_p

रणजी क्रिकेटपटूंना पन्नास टक्के भरपाई देण्याची शिफारस

Patil_p
error: Content is protected !!