Tarun Bharat

भारत-इंग्लंड महिला कसोटीला आज प्रारंभ

Advertisements

वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल

यजमान इंग्लंड आणि भारत महिला क्रिकेट संघातील एकमेव कसोटीला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. जवळपास सात वर्षांनंतर भारतीय महिला संघाला कसोटी सामना खेळण्याची संधी लाभली आहे. यजमान इंग्लंड संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर हा संघ थोडा प्रबळ वाटतो. भारतीय महिला संघाला इंग्लंड दौऱयासाठी सरावाकरिता पुरेसा कालावधी मिळालेला नाही, ही प्रतिकूल बाब ठरु शकते.

कोरोना समस्येमुळे मिताली राजच्या भारतीय महिला क्रिकेट संघाला मायदेशात आणि इंग्लंडमध्ये अनेक वेळा क्वारंटाईन राहावे लागले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने यापूर्वी म्हणजे 2014 नोव्हेंबर महिन्यात आपली शेवटची कसोटी खेळली होती. बुधवारपासून सुरू होणाऱया कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला सरावासाठी जवळपास आठवडाभराचा कालावधी मिळाला. 2014 साली म्हैसूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तत्कालीन भारतीय महिला संघातील सात क्रिकेटपटूंचा बुधवारपासून सुरू होणाऱया सामन्यासाठी भारतीय संघात समावेश आहे.

भारतीय क्रिकेट महिला संघामध्ये कर्णधार मिथाली राज, उपकर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मंदाना आणि झुलन गोस्वामी यांना बराच अनुभव असला तरी अलिकडच्या काही कालावधीत या क्रिकेटपटूंना कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमश्रेणी सामने खेळणाऱया संघातील काही नवोदित क्रिकेटपटूंची या सामन्यात सत्वपरीक्षा ठरणार आहे. उभय संघातील ही एकमेव कसोटी चार दिवसांची राहील.

भारतीय महिला संघाने या सामन्यासाठी बऱयापैकी नेटमध्ये सराव केला आहे. या कसोटीसाठी भारतीय क्रिकेटपटूंचे मनोबल उंचावलेले आहे, असे हरमनप्रित कौरने म्हटले आहे. स्मृती मानधनासमवेत 17 वर्षीय शेफाली वर्माला सलामीला फलंदाजीसाठी पाठविले जाईल. इंग्लंडमधील वातावरण तसेच खेळपट्टय़ा यांच्याशी जुळवून घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना संघर्ष करावा लागेल.

शिखा पांडे आणि झुलन गोस्वामी यांना या सामन्यात अधिक गोलंदाजी करावी लागेल. अनुभवी मिताली राज, हरमनप्रित कौर आणि पुनम राऊत यांच्या कामगिरीवरच भारतीय संघाचे यश अवलंबून राहील. इंग्लंडमधील भारतीय महिला संघाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास या संघाने गेल्या आठ सामन्यात एकही पराभव पत्करलेला नाही. भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये यापूर्वी दोन सामने जिंकले आहेत.

भारतीय संघ- मिताली राज (कर्णधार), हरमनप्रित कौर (उपकर्णधार), स्मृती मंदाना, पुनम राऊत, प्रिया पुनिया, दिप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्यूज, शेफाली वर्मा,  स्नेह राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरूंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिस्त आणि राधा यादव.

इंग्लंड संघ- हिथर नाईट (कर्णधार), अर्लाट, बिमाँट, ब्रंट, क्रॉस, डेव्हिस, डंकले, इक्लेस्टोन, इलवीस, फँरेट, ग्लेन, जॉन्स, स्विव्हेर (उपकर्णधार), श्रबसोल, व्हिर्लेस, विल्सन, विनफिल्ड- हिल.

इंग्लिश महिला संघाचे नेतृत्व हिथरकडे

यजमान इंग्लंड संघाचे नेतृत्व हिथर नाईटकडे सोपविण्यात आले आहे. या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ फेवरीट मानला जातो आहे. मिताली राज आणि झुलन गोस्वामी मात्र इंग्लंड संघाला डोकेदुखी ठरू शकतात भारताला या सामन्यात पराभूत करणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघाची कर्णधार हिथर नाईटने व्यक्त केली आहे. इंग्लंड संघामध्ये सहा अष्टपैलूंचा समावेश आहे तर नॅट स्किव्हेरकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. ही कसोटी चुरशीची होईल, अशी अपेक्षा आहे. नाणेफेकीचा कौल तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Stories

ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेत झेकची प्लिसकोव्हा अजिंक्य

Patil_p

यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला धोंडशिरेची दुखापत

Patil_p

शदमन इस्लामचे अर्धशतक, वारिकनचे 3 बळी

Patil_p

जाफना किंग्जचा कोलंबो स्टार्सवर विजय

Patil_p

अँडरसनचे पाच बळी, भारत सर्व बाद 364

Patil_p

मनगटी फिरकीपटू चहल-कुलदीप आज आमनेसामने

Amit Kulkarni
error: Content is protected !!