Tarun Bharat

भारत-ऑस्ट्रेलिया यांचे 3 टी-20 सामने सप्टेंबरमध्ये

Advertisements

मेलबर्न / वृत्तसंस्था

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी-20 सामने खेळणार आहे. सप्टेंबरमध्ये ही मालिका आयोजित करण्यात आली आहे. यंदाची टी-20 वर्ल्डकप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होत आहे. ऑस्ट्रेलियन संघ याशिवाय, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, विंडीज व इंग्लंडविरुद्ध देखील मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात काही सामने खेळणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. याशिवाय, पुढील वर्षात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये 4 कसोटी सामने खेळणार आहे.

यंदाची आयपीएल स्पर्धा संपन्न झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात 5 टी-20 सामने खेळणार आहे. ही मालिका दि. 9 ते 19 जून या कालावधीत होईल. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुधारित कार्यक्रमानुसार, पाचव्या व शेवटच्या एकमेव कसोटीसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. ही कसोटी मागील जुलैमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना उद्रेकामुळे सदर लढत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 3 टी-20 व 3 वनडे देखील खेळणार आहे.

Related Stories

विंडीज-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चुरशीचा सामना

Patil_p

फ्रेंच स्पर्धेतील विजेती स्वायटेक क्वारंटाईनमध्ये

Patil_p

उत्तेजक चाचणीत तरणजीत कौर दोषी

Patil_p

चेन्नईसमोर आज दिल्ली कॅपिटल्सचे मोठे आव्हान

Patil_p

सततच्या चाचण्या अन् प्रीती झिंटा म्हणते, मी आता ‘कोव्हिड टेस्ट क्वीन’!

Patil_p

इंग्लंड दौऱयावर जाण्यास तीन विंडीज खेळाडूंचा नकार

Patil_p
error: Content is protected !!