Tarun Bharat

भारत गॅसची बुकिंगसाठी व्हॉट्सअप सुविधा

Advertisements

ऑनलाईन पेमेन्टची सुविधा : कंपनीचे 7.10 कोटी ग्राहक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) यांच्याकडून एलपीजी गॅस सिलेंडर असणाऱया ग्राहकांसाठी आता व्हॉट्सअपच्या आधारे गॅस बुकिंग करण्याची सुविधा मिळणार असून त्याचा प्रारंभही करण्यात आला आहे. ग्राहकांना 27 मेपासून नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून गॅस बुक करता येणार आहे. कोविडच्या वाढत्या संकटात आता कोविडसोबत आपला जीवनप्रवास सुरु ठेवण्यासाठी विविध नवीन नियम आकारण्यात येत आहेत. यामुळे उद्योग जगतामधील विविध कंपन्या आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेत आहेत. आता व्हॉट्सअपच्या आधारे गॅस बुकिंग करण्याची योजना त्याचाच एक भाग असल्याचे भारत पेट्रोलियमकडून सांगण्यात आले आहे.

बदलासोबतचा प्रवास

लहानपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण व्हॉट्सअप वापरण्यात तरबेज झाले आहेत. यामुळे या बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपला प्रवास सुरु ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक (एलपीजी) टी.पिताम्बरम यांनी सांगितले आहे.

पेमेंट सुविधा

ग्राहकांना व्हॉट्सअपवर मॅसेजच्या माध्यमातून एक लिंक शेअर करण्यात येणार आहे. त्याच्या मदतीने ग्राहकाला रिफिलच्या आधारे प्रीपेड ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. यासाठी डेबिट कार्ड, पेडिट कार्ड, यूपीआय आणि ऍमेझॉनसारख्या पेमेंट
ऍपचाही वापर करता येणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

बुकिंग कसे करावे? व्हॉट्सअपवर बुकिंगसाठी स्मार्टलाइन नंबर 1800224344 च्या माध्यमातून ग्रहकांना गॅस बुक करता येणार आहे. ग्राहकांना आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन मेसेज करावा लागेल. प्ग्. त्यानंतर ँददक् किंवा 1 टाईप करुन पाठवून द्यावे. त्याच्या काही वेळाने आपले बुकिंग झाल्याचा तपशील मोबाईलवर प्राप्त होणार आहे. कंपनीचे देशभरात जवळपास 7.10 कोटी ग्राहक असल्याचाही खुलासा केला आहे.

Related Stories

अरविंद लिमिटेडला झाला तोटा

Patil_p

कृषिपरिवर्तनाची नांदी

Omkar B

मार्च 2022 पर्यंत आसाममध्ये विविध बँकांच्या शाखा

Amit Kulkarni

यस बँकेच्या सीएफओपदी बानोडकर

Patil_p

अमिताभ चौधरी ऍक्सिस बँकेचे एमडी

Patil_p

सेन्सेक्स दुसऱ्या सत्रात ४०३ अंकांवर झेपावला

Patil_p
error: Content is protected !!