Tarun Bharat

भारत-चीनदरम्यान चुशुल-मोल्डो येथे चर्चा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारत आणि चीनदरम्यान चुशुल-मोल्डोमध्ये रविवारी कमांडर स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही देशांमधील चर्चेची ही सोळावी फेरी आहे. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. बैठकीच तपशील सोमवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्चमध्ये 15 वी कॉर्प्स कमांडरची बैठक झाली होती. चर्चेच्या सोळाव्या फेरीत गोगरा-हॉट स्प्रिंग्जमधील गस्त बिंदू 15 व्यतिरिक्त, डेमचोक आणि डेपसांग येथून सुटका करण्यावर चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे.

दोन्ही देशांदरम्यान पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) लष्कराचे विघटन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय बाजूचे नेतृत्व फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल ए. सेनगुप्ता करत आहेत. बैठकीत मागील फेरीची चर्चा पुढे सुरू ठेवली जाणार आहे. भारत आणि चीन एप्रिल-मे 2020 पासून फिंगर एरिया, गलवान व्हॅली, हॉट स्पिंग्ज आणि कोंगरुंग नाला यासह अनेक भागात चिनी सैन्याच्या उल्लंघनावरून वाद सोडवण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीनंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेमुळे पँगाँग त्सोच्या उत्तर-दक्षिण भागासह गलवानच्या काही भागातून सैन्य मागे घेण्यात आले असले तरी अजूनही काही वादग्रस्त भाग शिल्लक आहेत.

Related Stories

‘मंकीपॉक्स’ रोखण्यासाठी ५ हजार ३०० लसींचे वाटप

Rohit Salunke

व्हिक्टोरियात आणीबाणी

Patil_p

पहिल्या तिमाहीत 50 कोटी लोकांना डोस

Patil_p

अमेरिकेकडून मिळणार कोरोना लसी

Patil_p

येथे सीटबेल्ट लावण्यास सक्त मनाई

Patil_p

माणुसकी व्यक्त करणारे छायाचित्र

Patil_p