Tarun Bharat

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे ही बैठक होईल. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली.

गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी भारत-चीनच्या सैनिकांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंचारात झाले यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले असून काही जण जखमी आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Related Stories

“मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक”

Archana Banage

काँगेसची आणखी एक पोस्टर गर्ल भाजपमध्ये

Patil_p

पंजाब : शेतकरी आंदोलनात सहभागी न झाल्यास 5 हजारांचा दंड

datta jadhav

राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ ‘लोकप्रिय’

Patil_p

आदित्य ठाकरेंसह 16 जणांची आमदारकी रद्द होणार?

datta jadhav

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर

Archana Banage