Tarun Bharat

भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट, भारताचे 4, चीनचे 7 जवान किरकोळ जखमी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

उत्तर सिक्कीममधील नाकूला सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कर आणि चिनी पीएलएमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सीमेवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नाकूला सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर आज चिनी सैनिकांनी उद्दामपणा दाखवल्याने दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत भारताचे 4 तर चीनचे 7 जवान जखमी झाले आहेत. काही काळ सुरू असलेला वाद स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या हस्तक्षेपानंतर निवळला. त्यानंतर भारतीय लष्कर आणि चिनी पीएलए सैनिक आपापल्या पोस्टवर गेल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

… ‘त्या’ घटनेनंतर भाजप सचिवांना मिळाली ‘झेड’ सुरक्षा

Tousif Mujawar

‘सीआयएससीई’ बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर

Patil_p

यावर्षी होणार ५ कंपन्यांचे खासगीकरण

Amit Kulkarni

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मुहूर्त अधांतरी

Patil_p

भुकेल्यांच्या मदतीला धावले पेट्रोलपंप चालक

Patil_p

हबीबगंज रेल्वेस्थानकाचे नाव बदलण्याची मागणी

Patil_p
error: Content is protected !!