Tarun Bharat

भारत-चीन सैन्यांत पुन्हा झटापट

ऑनलाईन टीम / सिक्कीम : 

उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला सीमेवर तीन दिवसांपूर्वी भारत-चीन सैन्यांत पुन्हा एकदा झटापट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

तीन दिवसांपूर्वी पेट्रोलिंग करणाऱ्या चिनी सैन्यांने भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय सैन्याने प्रतिकार केला असता दोन्ही सैन्यांत झटापट झाली. या झटापटीत दोन्ही देशांचे काही सैनिक जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात परंतु तणावाची असल्याचे सांगण्यात येते. भारतीय लष्कराकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

दरम्यान, एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी रविवारी भारत आणि चीनमध्ये कोअर कमांडर स्तरावर 17 तासांची मॅरेथॉन बैठक झाली होती.

Related Stories

शाळकरी मुलावर अत्याचार करणाऱ्या 27 वर्षीय महिलेला 20 वर्षांचा तुरुंगवास

Archana Banage

म्हणून साजरा करतात ‘कारगिल विजय दिवस’

Rohit Salunke

भारतीय सैन्याला मिळाली स्वदेशी शस्त्रास्त्र

Patil_p

प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री लोढांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

Archana Banage

सुरक्षा यंत्रणांच्या रडावर शोपियांतील शाळा

Omkar B

Satara : पिलाणीमध्ये तीन घरे जळून खाक

Archana Banage