Tarun Bharat

भारत-चीन सैन्यात पुन्हा झटापट?

Advertisements

ऑनलाईन टीम / लेह :    

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. या वृत्ताचे भारतीय लष्कराने खंडन केले असून, यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.  

भारतीय लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये कोणतीही झटापट झाली नव्हती. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. यापुढे सैन्य अधिकारी किंवा अधिकृत स्रोतांमार्फत खुलासा होईपर्यंत माध्यमांनी कोणतेही वृत्त प्रसिद्ध करु नये.    

23 मे रोजी ‘द हिंदू’ने गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झटापट झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. सूत्रांच्या हवाल्याने त्यांनी हे वृत्त दिले होते. मात्र, हे वृत्त निरर्थक आहे.

Related Stories

रविवारचा संपूर्ण लॉकडाऊन शिथिल

Patil_p

केरळच्या पत्रकाराला अखेर जामीन मंजूर

Patil_p

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीला अटक, पुणे पोलिसांची कार्यवाही

Archana Banage

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

datta jadhav

भारतात एकूण लसीकरणाने केला 94 लाखाचा टप्पा पार

Tousif Mujawar

दोन दहशतवादी चकमकीत ठार

Patil_p
error: Content is protected !!