Tarun Bharat

भारत-द. आफ्रिका तिसरी व शेवटची वनडे आज

Advertisements

भारतीय संघासमोर उरलीसुरली पत राखण्याचे आव्हान

केपटाऊन / वृत्तसंस्था

कसोटी मालिकेनंतर वनडेतही धोबीपछाड झालेला भारतीय क्रिकेट संघ आज (रविवार दि. 23) यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया तिसऱया व शेवटच्या वनडे लढतीत उरलीसुरली पत राखण्यासाठी मैदानात उतरेल तर दुसरीकडे, यजमान द. आफ्रिकन संघ क्लीन स्वीपसाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत दुपारी 2 पासून खेळवली जाईल.

केवळ फलंदाज या नात्याने संघात असणाऱया विराट कोहली या औपचारिक लढतीत शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यात यशस्वी ठरला तर ते महत्त्वाचे ठरेल. विराटला 2019 नंतर एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर, त्याला सूर सापडणे लक्षवेधी ठरु शकेल.

या मालिकेत भारताला पहिल्या वनडेत 31 धावांनी तर दुसऱया वनडेत 7 गडय़ांनी पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकन दौऱयात भारताचा हा सलग चौथा पराभव ठरला. ही अपयशी मालिका खंडित करण्यासाठीही भारतीय संघाला कसोशीने प्रयत्न करावे लागतील.

पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात शिखर धवन व केएल राहुल या दिग्गजांनी आश्वासक फलंदाजी केली. पण, सांघिक स्तरावर आणखी उत्तम यश संपादन करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा असेल. दुसऱया वनडेत रिषभ पंतने 71 चेंडूत 85 धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. येथेही तो चौफेर फटकेबाजी करु शकेल, अशी अपेक्षा असणार आहे.

वेंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर यांना अद्याप फलंदाजीत सूर सापडलेला नाही. त्यामुळे, धावांचा दुष्काळ संपुष्टात आणण्यावर त्यांना भर द्यावा लागेल. भारतीय व्यवस्थापन तिसऱया व शेवटच्या वनडेत सुर्यकुमार यादवला संधी देणार का, याबद्दलही उत्सुकता असणार आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारची कामगिरी सर्वात निष्प्रभ ठरली असून सिराजला संधी मिळू शकते. फिरकीपटू अश्विन व यजुवेंद्र चहल यांनी बऱयापैकी गोलंदाजी केली असली तरी त्यांना यशश्रीने सातत्याने हुलकावणी दिली आहे.

बुमराहने प्रभावी मारा केला असला तरी त्याला दुसऱया वनडेत पॉवर प्ले षटकात विकेट घेता न आल्याचा संघाला फटका बसला. भारतीय संघ त्या लढतीत 287 धावांचे संरक्षणही करु शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर उत्तम वर्चस्व गाजवले असून हीच घोडदौड कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. 

प्रतिस्पर्धी संघ

भारत ः केएल राहुल (कर्णधार), जसप्रित बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), केशव महाराज, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), झुबेर हमझा, मार्को जान्सन, जे. मलान, सिसान्दा, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, वेन पर्नेल, फेहलुकवायो, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, काईल व्हेरेन.

सामन्याची वेळ ः दुपारी 2 वा.

बॉक्स

स्लो ओव्हर-रेटमुळे यजमान संघाला दंड

पार्ल येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱया वनडे लढतीत स्लो ओव्हर-रेटमुळे यजमान दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना 20 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला. निर्धारित वेळेत दक्षिण आफ्रिकन संघाने एक षटक कमी टाकले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यानंतर संघावर दंडात्मक कारवाई केली गेली.

Related Stories

लंकेचा भारतावर मालिका विजय

Patil_p

विंडीजचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत

Patil_p

पीव्ही सिंधूने पटकावलं महिला एकेरीचे विजेतेपद

datta jadhav

ब्रिस्बेन हिटचा कर्णधार ख्रिस लिनला दुखापत

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सिंधू उपस्थित राहणार

Patil_p

टेनिस स्पर्धेसाठी दोन हजार शौकिनांना परवानगी

Patil_p
error: Content is protected !!