Tarun Bharat

भारत-नेपाळ संयुक्त सराव सोमवारपासून

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त सैन्य सरावाला सोमवारपासून उत्तराखंडमधील पिठोरागड येथे प्रारंभ होत आहे. फुटीरतावाद्यांशी लढण्यग्नाची तयारी म्हणून हा सराव आयोजित करण्यात आला आहे. डिसेंबर 2019 मध्ये असा सराव नेपाळमध्ये करण्यग्नात आला होता, अशी माहिती देण्यात आली.

या सरावातून दोन्ही सेनादलांना एकमेकांची शस्त्रे, अस्त्रे, युद्धतंत्रे आणि प्रक्रिया यांचा परिचय होईल. तसेच डोंगराळ भागात कारवाई करण्यग्नास दोन्ही सेना अधिक सक्षम होतील. या सरावात मैदानी कारवायांसोबतच शैक्षणिक सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सेना तज्ञांची भाषणे आणि चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. चर्चासत्रे आणि भाषणांचे विषय उंचीवरील युद्धे, वनक्षेत्रातील युद्धे आणि नवे युद्धतंत्र असे असतील, असे स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा भीषण अपघात; 100 फूट दरीत कोसळला ट्रक

datta jadhav

प्रतिष्ठित नोकरी सोडून वेश्यांसाठी काम

Patil_p

नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी, पूनमिया कुटुंबियांचा मृत्यू

datta jadhav

उत्तर प्रदेश : भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

“आताच्या भारतीय महिलांना एकटं रहायचंय, त्यांना मुलं नकोयत;” भाजपा मंत्र्याचं विधान

Archana Banage

Asaram Bapu : आसाराम बापूला बलात्कार प्रकरणात १० वर्षे जन्मठेपेची शिक्षा

Abhijeet Khandekar