Tarun Bharat

भारत पुरुष संघाचा हाँगकाँगवर विजय

आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप : 3-2 फरकाने निसटती मात, बाद फेरी गाठण्याची अंधुक आशा

वृत्तसंस्था /शाह आलम, मलेशिया

लक्ष्य सेनच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅडमिंटन पुरुष संघाने गट अ मधील लढतीत हाँगकाँगचा 3-2 असा पराभव करून बॅडमिंटन आशियाई सांघिक चॅम्पियनशिपमध्ये बाद फेरी गाठण्याच्या अंधुक आशा जिवंत ठेवल्या आहेत.

पहिल्या सामन्यात भारताला कोरियाकडून 0-5 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता, त्याचा बराच फटका भारताला बसला असून गट अ मध्ये ते आता तिसऱया स्थानावर आहेत. भारताने एक विजय व एक पराजय मिळविला असून ते हाँगकाँगपेक्षा पुढे आहेत. या गटातून इंडोनेशिया व कोरिया यांच्यात बाद फेरी गाठण्यासाठी चुरस लागली आहे.

इंडिया ओपन स्पर्धा जिंकणारा लक्ष्य सेन, मिथुन मंजुनाथ व दुहेरीची जोडी हरिहरन अम्साकरुनन व रुबन रेथिनासबापती कुमार यांनी सरस कामगिरी केल्याने भारताला हाँगकाँगवर विजय मिळविता आला. जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असणाऱया लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असणाऱया ली चेयुक यियू याच्यावर 21-19, 21-10 अशी मात करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरीत लॉ चेयुक हिम व ली चुन हेई रेजिनाल्ड यांनी मनजित सिंग ख्वैराकपम व डिंग्कू सिंग कोन्थौजम यांच्यावर 20-22, 21-15, 21-18 अशी रोमांचक लढतीत मात केली. ओडिशामध्ये सुपर 100 स्पर्धा जिंकणाऱया किरण जॉर्जने झुंजार प्रदर्शन केले. मात्र त्याला चॅन यिन चॅककडून 13-21, 21-17, 9-21 असा पराभव स्वीकारावा लागला. या विजयाने हाँगकाँगने 2-1 अशी आघाडी मिळविली होती.

हरिहरन व रुबन कुमार यांनी चौ हिन लाँग व लियू चुन वेई यांना 21-17, 21-16 असे हरवून भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. सय्यद मोदी सुपर 300 स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या मंजुनाथने निर्णायक सामन्यात जेसन गुनावानवर 21-14, 17-21, 21-11 अशी मात करून भारताला विजय मिळवून दिला. मात्र बाद फेरी गाठण्यासाठी शुक्रवारी बलाढय़ इंडोनेशियाविरुद्ध होणारी लढत भारताला जिंकावी लागेल तर त्याचवेळी कोरियाला हाँगकाँगकडून पराभूत होईल, अशी अपेक्षा करावी लागेल.

भारत व कोरिया यांनी एक विजय व एक पराभव स्वीकारला असल्याने दोघे समान स्थितीत आहेत. शुक्रवारी या दोन्ही संघांनी विजय मिळविला तर जिंकलेले सामने व जिंकलेल्या-गमविलेल्या गेम्सच्या आधारे निर्णय घेतला जाईल. याबाबतीत कोरिया भारतापेक्षा आघाडीवर आहे. भारताच्या महिला संघाला पहिल्या लढतीत मलेशियाकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. शुक्रवारी त्यांची लढत विद्यमान विजेत्या जपानविरुद्ध होणार आहे.

Related Stories

चेन्नई सुपरकिंग्ज संघात बेहरेनडॉर्फचा समावेश

Patil_p

केव्हिन ओब्रायन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

नदालचा 1000 वा विजय

Patil_p

मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p

स्पेनचा क्रेस्पो ओडिशा एफसीशी करारबद्ध

Patil_p

प्रिमियर लीगमधील चार फुटबॉलपटू कोरोना बाधित

Patil_p