Tarun Bharat

भारत फिलिपिन्सला करणार ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची निर्यात

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत फिलिपिन्सला ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची निर्यात करणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान दोन्ही देशात संरक्षणासह अन्य करारांवरही स्वाक्षऱ्या होतील. या कराराअंतर्गत फिलिपिन्स भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची खरेदी करणार आहे. 

‘ब्रह्मोस’ हे हवेतून जमिनीवर मारा करणारे भारताचे घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. भारत आणि रशिया संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची निर्मिती करते. 

6 नोव्हेंबरला भारत आणि फिलिपिन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाची व्हर्च्यूअल मिटींग झाली होती. त्यामध्ये ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या निर्यातीची चर्चा झाली होती. त्यानुसार फेब्रुवारी 2021 मध्ये यासंदर्भात करार होणार आहे.

Related Stories

अनलॉक 3.0 ची घोषणा आज?

Patil_p

बाधितांच्या संख्येत वाढ

datta jadhav

कोरोनाबाधित फारुख अब्दुल्ला यांना रुग्णालयात हलविले

Tousif Mujawar

पंतप्रधान मोदींनी 100 व्या किसान रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

datta jadhav

जगदीप धनखड उपराष्ट्रपतिपदी शपथबद्ध

Amit Kulkarni

माजी खासदार पप्पू यादव यांना अटक

Archana Banage
error: Content is protected !!