नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स यांच्यात 7 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे वार्षिक सामरिक चर्चा होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच एनएसए अजित डोवाल भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील तर फ्रान्सच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व तेथील अध्यक्षांचे राजनयिक सल्लागार इमॅन्युएल बोने यांच्याकडे असणार आहे. या बैठकीत दोन्ही देश व्यापक द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. या चर्चेत अन्य भारतीय प्रतिनिधीही उपस्थित असतील. यापूर्वीची सामरिक विषयक मागील बैठक फेब्रुवारी 2020 मध्ये पॅरिस येथे आयोजित करण्यात आली होती.


previous post