Tarun Bharat

भारत बंदला कुडचीत उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisements

कुडची

सीएए, एनआरसी कायद्याविरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी  बंदला कुडचीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.

भारत बंद पुकारलेल्या विविध संघटनांच्या आवाहाना प्रतिसाद देत एनआरसी सीएए आणि एनपीआर या कायद्याच्या विरोधात 29 जानेवारी रोजी बंद पुकारण्यात आला होता. याला पाठिंबा देत कुडचीतील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सर्व बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. व्यापाऱयांनी खुल्यापणाने यात सहभाग घेतला. सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. त्याबरोबर ऑटो रिक्षाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे शाळेला जाण्यासाठी रिक्षाच नसल्याने अनेक मुलांनी शाळांना दांडी मारली. तसेच रिक्षा बंदचा फटका सामान्यांनाही बसला. बस बंदचाही प्रवाशांना फटका बसला. बंदच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कुडचीचे उपनिरीक्षक शिवराज दानीगोड यांनी सहकाऱयांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

वन टच फाऊंडेशनकडून दुर्गम भागात मदत

Patil_p

सेव्हनस्टार निपाणी सुपरबझार चषकाचा मानकरी

Patil_p

ऐन हंगामात लॉकडाऊनमुळे जनावरांचे बाजार बंद

Patil_p

खैरवाड येथील दुर्गादेवी यात्रोत्सव उद्यापासून

Amit Kulkarni

बाळाने नकळत हाताने चक्क सापाला केला स्पर्श!

Patil_p

बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडपासाठी परवानगी

Tousif Mujawar
error: Content is protected !!