Tarun Bharat

भारत बंद नावालाच…

Advertisements

प्रतिनिधी/सोलापूर

देशभरातील कामगार संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी केलेल्या संपास सोलापुरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने भारत बंद फक्त नावालाच असल्याचे स्पष्ट झाले.

 माकपने शहरातील 10 ठिकाणी रस्ता रोको, जेलभरो आंदोलन केले तर जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका गेटसमोर चतुर्थ श्रेणी कर्मचारी, दिव्यांग कर्मचाऱयांनी धरणे आंदोलन करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. फक्त बँकिंग, सरकारी कामकाज ठप्प झाले होते. किरकोळ घटना वगळता सोलापुरातील जनजीवन पूर्वपदावर होते.

  रेल्वे, बस, रिक्षा, दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, शाळा, महाविद्यालयावर संपाचा प्रभाव दिसला नाही. कामगारांच्या विविध मागण्यांसह चतुर्थ, तृतीय श्रेणी कर्मचाऱयांच्या मागण्यांसाठी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. मात्र या संपास सोलापुरातून संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सकाळी नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार सुरूच होते, तर सकाळची मुंबई, पुण्याहून येणारी रेल्वे निर्धारित वेळेत आली. नवी पेठ, विजापूर वेस, टिळक चौकासह शहरातील प्रमुख चौकातील दुकाने सुरू होती. तसेच शहरातील चहाच्या टपऱया, किरकोळ व्यापाऱयांचे दुकाने, शाळा, महाविद्यालय सुरूच होत्या. बस, रेल्वे, रिक्षा सेवा, रुग्णसेवा, दवाखाने, मेडिकल, पेट्रोल पंपही नियमितपणे सुरू होते. जेलभरो आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने, बँकातील व्यवहार, सरकारी व्यवहार वगळता बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आला. जेलभरो आंदोलनात 2 हजार 250 कर्मचाऱयांना अटक करण्यात आली.

बुधवारी साप्ताहिक सुट्टी; कारखाने बंद

कामगारांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. मात्र आज बुधवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे विडी, यंत्रमागासह इतर कारखान्यांना सुट्टीच होती. यामुळे एमआयडीसीत मात्र शुकशुकाट होता.

Related Stories

सोलापूर शहर तिसऱ्या टप्प्यात

Archana Banage

वरदायनी उजनीचा मायनसमध्ये प्रवेश

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 152 नवे कोरोनाबाधित

Archana Banage

मंगळवेढयातील नगराध्यक्षांच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन चौथ्या दिवशी स्थगित

Archana Banage

पर्यावरण साक्षरता वाढविण्याची गरज : डॉ. सचिन पुणेकर

prashant_c

बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी कोरोना बाधित

Archana Banage
error: Content is protected !!