Tarun Bharat

भारत-लंका पहिला टी-20 सामना आज

वृत्तसंस्था/ कोलंबो

यजमान लंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येथे रविवारी प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता प्रारंभ होईल.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताच्या दुय्यम संघाने लंकेविरुद्धची वन डे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. आता टी-20 मालिका जिंकून या दौऱयाचा समारोप करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. या संघाला राहुल द्रविड प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभला आहे. या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला संधी दिली आहे. पहिल्या सामन्यात चक्रवर्ती अंतिम अकरा खेळाडूत खेळेल, असा अंदाज आहे. देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड हे नवोदित फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी आतुरलेले आहेत. कर्नाटकाच्या पडिक्कलने गेल्या वषी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने अधिक धावा जमविल्या आहेत. ईशान किसन आणि संजू सॅमसन यांना अंतिम अकरा खेळाडूत संधी दिली जाईल. लंकेचे नेतृत्व शनाकाकडे सोपविण्यात आले आहे. यजमान लंकेने शुक्रवारी वन डे मालिकेतील शेवटचा सामना जिंकला असल्याने त्यांचा आत्मविश्वास थोडा वाढला आहे. टी-20 मालिकेत लंकेचा संघ कडवी लढत देईल, अशी अपेक्षा आहे.

भारत- धवन (कर्णधार), शॉ, पडिक्कल, गायकवाड, मनीष पांडे, हार्दिक पांडय़ा, नितीश राणा, ईशान किसन, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पांडय़ा, कुलदीप यादव, चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि साकारिया.

लंका- शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, आविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पी. निशंका, सी. असलेंका, हसरंगा, ए. बंदारा, भानुका, उदारा, रमेश मेंडीस, चमिका करुणारत्ने, बिनोरा फर्नांडो, डी. चमिरा, सँडेकेन, अकिला धनंजय, शिरान फर्नांडो, धनंजय लक्षेन, जयरत्ने, जयविक्रमा, असिता फर्नांडो, रजिता, कुमारा आणि उदाना.

सामन्याची वेळ- भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू.

Related Stories

नेदरलँड्स सर्वप्रथम उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

संपूर्ण भारतीय पुरूष बॅडमिंटन संघ आयसोलेशनमध्ये

Patil_p

महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कप संघात तीन स्पिनर्स

Amit Kulkarni

रामकुमारचे आव्हान समाप्त

Amit Kulkarni

बार्सिलोना संघाकडून बेटीस पराभूत

Patil_p