Tarun Bharat

भारत-श्रीलंका संघांचे पुण्यात आगमन

पुणे /  प्रतिनिधी 

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसऱया सामन्यासाठी दोन्ही संघाचे बुधवारी पुण्यात आगमन झाले. येत्या 10 जानेवारीला (शुक्रवार) हा सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळविण्यात येणार आहे. 

गुवाहाटी येथील पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर इंदोरमधील सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शुक्रवारी पुण्यात होणारा सामना निर्णयाक ठरणार आहे. या सामन्यासाठी आज दोन्ही संघांचे दुपारी 12.30 च्या सुमारास पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी विमानतळावर खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी क्रिकेट रसिकांनी गर्दी केली. त्यानंतर पोलिसांनी चोख बंदोबस्तात खेळाडूंना हॉटेलकडे नेण्यात आले. उद्या (गुरूवारी) दोन्ही संघ गहुंजे मैदानावर सराव करणार आहेत.

Related Stories

उत्तराखंड बाद फेरीमध्ये दाखल

Patil_p

राजस्थानविरुद्ध मुसंडी मारण्याचे दिल्लीचे प्रयत्न

Patil_p

बीएफआयचे ईडी आर. के. सचेती यांचे निधन

Patil_p

लाबुशानेचे कसोटीतील पहिले द्विशतक

Patil_p

नेदरलँड्स हॉकी संघाचे भुवनेश्वरमध्ये आगमन

Patil_p

वर्ल्ड चॅम्पियन कोलमनवर दोन वर्षांची बंदी

Omkar B
error: Content is protected !!