Tarun Bharat

भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांना सुरुवात

देशासाठी जगणे गरजचे- मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत

प्रतिनिधी/ पणजी

 देशात विविध ठिकाणी भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गोव्यातही मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांना सुरुवात झाली. भारत स्वातंत्र्य होऊन 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने पुढील 75 आठवडे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी कार्यक्रम भारतात विविध ठिकाणी होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माहिती व प्रसार खात्यातर्फे गोव्यात भारत स्वतंत्र अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील आझाद मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी व्यसपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नेहरू युवा पेंद्राचे उत्तर गोवा निमंत्रक कालीदास घाटवळ, माहिती आणि प्रसार खात्याचे संचालक सुधीर केरकर कार्यकारी मुख्य सचिव कृणाल (आयएएस अधिकारी) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधीजींनी दांडी मार्चला सुरुवात केली होती. भारताच्या इतिहासातील तो एक महत्त्वाचा दिवस आहे. त्याचे औचित्य साधून केंद्र सरकारतर्फे भारत स्वातंत्र्य अमृत महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. 

भारत देश हा विश्व गुरु बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. कोविड 19 सारख्या महाभंयकर संकटावर मात करण्यासाठी जगातील अनेक देश धडपडत आहेत. भारताने या संकटावर उपाय म्हणून लसीकरण सुरू केले आहे. इतर काही देशांनाही त्याचा पुरवठा केला जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.  नवभारत निर्माण करण्यासाठी पेंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे. युवकांना आत्मनिर्भर बनण्यासाठी अनेक कार्यक्रम आखण्यात आले आहेत. याचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.

देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्रामाणाचे बलिदान दिले आहे. आज देशासाठी जगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नागेश सरदेसाई यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. आपला इतिहास फार मोठा आहे. त्यातील 12 मार्च हा फार महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी महात्मा गांधीजांनी दांडी मार्चला सुरुवात केली. त्याला आज 91 वर्षे पूर्ण होत आहे. या दांडी मार्चला जगभरातील पत्रकारही आले होते. तेव्हा जगाला कळून चुकले होते की, भारतातही स्वतंत्र चळवळ सुरू झाली आहे. नागेश देसाई यांनी इतिहासातील अनेक गोष्टी उपस्थातांसमोर मांडल्या. इतिहास माणसाला नव्याने जगण्याची ताकद देत असतो, म्हणूनच इतिहासाचा विसर पडू देऊ नये, असे वर्षा कामत यांनी सांगितले. नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभ भाई पटेल व महात्मा गांधी यांच्याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

सुरुवातीला आझाद मैदानावरील गोवा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते पुष्पांजली अपर्ण केली. नंतर सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण केले. साखळी येथील प्रोग्रेस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व देशभक्तीपर गीत सादर केले. सुधीर केरकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली मान्यवरांचे भाषण केले. आझाद मैदानावर चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते त्याचेही मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम गावकर यांनी केले होते.

Related Stories

आयएमबीमध्ये नाटय़संगीत महोत्सव

Patil_p

चांगल्या अधिकाऱयाचा भाजपने राजकारणासाठी बळी दिला

Amit Kulkarni

वास्कोत फळ विक्रेत्यांचे रस्त्या रस्त्यांवर अतिक्रमण

Amit Kulkarni

शाळा सुरू झाल्याचा विद्यार्थ्यांपेक्षा पालकांमध्ये जास्तउत्साह ,शाळेचा पहिला दिवस थाटात

Amit Kulkarni

साखळी नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनला लोकांचा चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

भाजपची निवडणूक तयारी सुरू

Amit Kulkarni