Tarun Bharat

“भारत २०१४ पासून अमेरिकेचा गुलाम”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

ऑनलाईन टीम/तरुण भारत

अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कंगनाने भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य भीक असून २०१४ मध्ये देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असं विधान केलं होतं. कंगनाची वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्थरातून टीका होत होती. आता काँग्रेस नेत्यानेही असंच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी भारत २०१४ पासून अमेरिकेचा गुलाम झाला आहे, असं विधान त्यांनी केलं आहे.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी हे वक्तव्य केलं आहे. इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात अय्यर म्हणाले की, २०१४ पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत रशिया संबंधांचा उल्लेख करत आपलं विधान सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी बोलताना, “गेल्या 7 वर्षात आपण पाहत आहोत की, पक्षांतराची कोणतीही चर्चा होत नाही. शांततेची चर्चा नाही. ते अमेरिकन लोकांचे गुलाम बनून बसले आहेत आणि ते म्हणतात चीनपासून वाचलं पाहिजे. भारत-रशियाचे संबंध वर्षानुवर्षे जुने आहेत, पण मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे, असे अय्यर सांगत होते. मणिशंकर अय्यर म्हणाले की, २०१४ पर्यंत रशियाशी आमचे जे संबंध होते, ते खूपच कमी झाले आहेत.

Related Stories

सॅनिटायझरच्या बाटलीवर लग्नपत्रिका

Patil_p

शिवसेना-भाजप युतीबाबत केसरकरांचा गौप्यस्फोट ; म्हणाले, राणेंमुळे युती…

Archana Banage

‘या’ राज्यात 4 महिन्यांनंतर आजपासून शाळा सुरू

Tousif Mujawar

‘कोविशिल्ड’, ‘कोवॅक्सिन’च्या 66 कोटी डोसची वाढीव दराने होणार खरेदी

datta jadhav

अंदमान आणि निकोबार बेटसमुहात जाणवले भूकंपाचे धक्के

Patil_p

लालूंच्या पक्षाला मोठा धक्का

Patil_p