Tarun Bharat

भाविकांच्या देणगीतून मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णत्वास

वार्ताहर / हलगा

मरगाई मंदिरसाठी भक्तांनी दिलेल्या देणगीतून आज मंदिर पूर्णत्वास आले आहे. मंदिरासाठी ज्यांनी देणगी दिली आहे त्याच्या कितीतरी पट भगवंत त्यांना देईल, असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. याप्रमाणे सर्वांनी मंदिरासाठी देणगी द्यावी. हलगा गावामध्ये काही वर्षांमध्ये श्री कल्मेश्वर, श्री भावकेश्वरी, श्री हनुमान मंदिरांचा जीर्णोद्धार झाला आहे. आता मरगाई मंदिराचाही जीर्णोद्धार पूर्णत्वास आला आहे. याचे श्रेय हलगा गावातील तमाम भक्तांना जाते, असे उद्गार मुत्नाळ गावातील केदारपीठाचे श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांनी केले.

रविवार दि. 21 रोजी मरगाई देवी मंदिराचा लहान कळसारोहण कार्यक्रम, सभागृह चौकट पूजन, लक्ष्मी गदगी व म्हारताळ मंदिराचा नूतनीकरणाचा कार्यक्रम पार पडला. शिवानंद शिवाचार्य स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मरगाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष धाकलू बिळगोजी होते. मरगाई देवी मंदिर सभागृह चौकट पूजन हलगा ग्रा. पं. अध्यक्ष गणपत मारिहाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. मरगाई देवी लहान कळसारोहण पूजन संदीप सैबन्नावर, लक्ष्मीदेवी गदगी पूजन व शिवाजी सामजी, म्हारताळ मंदिर पूजन ग्रा. पं. सदस्य चेतन कुरंगी यांच्या हस्ते करण्यात आले. अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले.

यावेळी ग्राम पंचायत नूतन उपाध्यक्षा रूपा सुतार, सदस्य सदानंद बिळगोजी, भुजंग सालगुडे, पिराजी जाधव, सागर कामणाचे, नझीर मुल्ला, विलास परीट, चेतन कुरंगी, तवनाप्पा पायक्का, सुजाता देसाई, भारती पायक्का, लक्ष्मी संताजी, कल्पना हणमंताचे, रेखा चिक्कपरप्पा, सरोज वडगावी, लक्ष्मी गजपती, रेखा परीट, प्रतिष्ठित नागरिक सिद्राय हणमंताचे, फकिराबाई मोरे, मारुती पुन्नाजी, सक्षम सुणगार, अण्णाप्पा हण्णीकेरी, नागप्पा पुन्नाजी, अप्पाजी चौगुले, पिराजी हेब्बाजी, अजित बस्तवाड, अण्णाप्पा घळग, राहुल बिळगोजी, अण्णाप्पा मडिवाळ, पार्वती बिळगुचे, मोनाक्का बिळगुचे, सुनील बिळगोजी, विजयरत्नमाला चौगुले, जिन्नप्पा धम्मणगी, सावित्री तारिहाळकर, प्रशांत सैबन्नावर, संजू पाटील, सुकुमार बेल्लद, सदानंद भोमन्नावर, महादेव घोरपडे, कृष्णा पाटील, रेवाणी संताजी, झी सप्ताहिक फंड, सुधीर उपाध्ये, संजय कंगळगौडा, संजीव पाटील (कंगळगौडा), येमाजी अनगोळकर, मरगाई देवी भजनी मंडळ, अल्ट्राटेक सिमेंट संचालक, फकिरा सामजी, नागेंद्र सामजी, महावीर कंगळगौडा, अभिनंदन कंगळगौडा, विजय बेल्लद, सुधा मुदनूर, चारुकिर्ती सैबन्नावर यांचा भगवा फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या सर्वांनी मंदिरासाठी भरीव देणग्या दिल्या.

Related Stories

रस्त्यासाठी 25 कोटी मुख्यमंत्र्याकडे मागणी

Amit Kulkarni

महिना होत आला तरी शालेय विद्यार्थी गणवेशाविना

Amit Kulkarni

पहिल्या रेल्वेगेट येथील बॅरिकेड्स हटविणार कधी?

Omkar B

सीमावासियांना न्याय देण्याची मागणी

Amit Kulkarni

यमनापूर सर्व्हिस रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

Omkar B

सर्वाधिक हेब्बाळ तर सर्वात कमी हुन्नूरमध्ये मतदान

Omkar B
error: Content is protected !!