Tarun Bharat

“भित्र्या सेलिब्रिटींनो, कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा ?”

मुंबई / ऑनलाईन टीम

देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्याराज्यात नागरिक उपचाराअभावी आपले प्राण गमावत आहेत, तर काही ठीकाणी ऑक्सिजन सारख्या मुलभूत घटकाअभावी नागरिक मृत्यूला कवटाळत आहेत. अशी भयावह स्थिती देशभरात असताना सेलिब्रिटी मात्र यावर कोणती ही प्रतिक्रीया देताना दिसत नाहीत. हीच मेख लक्षात घेत राजदचे नेते तेजस्वी यादव सेलिब्रिटींवर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरून सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

तेजस्वी यादव यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ”प्रिय भित्र्या सेलिब्रिटींनो, थोडासा तरी स्वाभिमान दाखवा, थोडंस तरी तुम्हाला प्रिय असलेल्या व्यक्तीच्या अनावश्यक प्राथमिकतांमुळे ऑक्सिजनसारख्या मुलभूत घटकासाठी तुमचे देशबांधव एक दुसऱ्यांच्या जीवांसाठी प्रत्येक सेंकदाला मरण कवटाळतायेत तरी ही तुमचा विवेक कुठे आहे ? कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा ? आणि ह्रदय? देशबांधवांशी प्रामाणिक रहा, सरकारशी नाही, ” असं म्हणत तेजस्वी यादव यांनी सेलिब्रिटींना चांगलच फटकारलं आहे.

देशातील कोरोनासंदर्भात देशातूनच नव्हे तर विदेशातील अनेक तज्ज्ञ, जाणकार यावर वेळोवेळी चिंता व्यक्त करत असताना सेलिब्रिटींनी धारण केलेल्या मौनावर तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक

Patil_p

नृसिंहवाडी कुरुंदवाड परिसरात आषाढी एकादशी साजरी

Archana Banage

रशियाची ‘ती’ लस ऑगस्ट मध्यापर्यंत होणार उपलब्ध

datta jadhav

राजू शेट्टींनी चूकच केली ; स्वाभिमानी कार्यकर्ते बरसले

Archana Banage

तीर्थक्षेत्र जेजुरीला मिळाला थ्री स्टार मानांकनाचा दर्जा

Patil_p

दांडके डोक्यात घालून कामगाराचा खून

Patil_p