Tarun Bharat

भिलवडीत कोरोनाबाधित सराफाच्या घरात १० लाखांची चोरी

प्रतिनिधी / भिलवडी

भिलवडी येथे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोरोनाबाधित सराफाच्या घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरी करून, सुमारे १० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भिलवडी ता. पलूस येथील श्रीराम ज्वेलर्सचे मालक श्रीराम सुरेश पोतदार (वय ३६) तसेच त्यांचे वडील सुरेश बाळकृष्ण पोतदार यांच्यासह कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सदर कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णांवर सांगलीमध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांच्या घरी सध्या कोणीच नसल्याने घराला कुलुप होते. याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून, घरातील तिजोरीतील सुमारे पाचशे ते सहाशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चांदीच्या कोणत्याही दागिन्यांना चोरट्यांनी हात लावला नाही. सदर दागिन्यांची किंमत जुन्या दराप्रमाणे सुमारे ९ लाख ९१ हजार ५०० रुपये तसेच रोख रक्कम १५ हजार असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचा अंदाज आहे. दरम्यान भिलवडी पोलिसांना याची खबर लागताच विटा उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल; भाजप खासदाराचा दावा

datta jadhav

कोणासही जीवे मारण्याची धमकी दिली नाही- सरपंच संजय घोरपडे

Archana Banage

देवगड हापूस सातारच्या बाजारपेठेत दाखल

Patil_p

शिक्षक बँकेने मयत शिक्षकांच्या अंत्यसंस्कार निधीत वाढ करावी: सौदागर

Archana Banage

सांगली : कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ

Archana Banage

कुसूरमध्ये शेतात आढळले तीन बछडे

Patil_p